एक्स्प्लोर

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन कोमामध्ये की मृत्यू? अखेर सत्य का लपवलं जातंय?

जगभरात उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी चर्चांना उधाण आलं आहे. किम जोंग उन कोमामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे तर काही जण त्याच्या मृत्याचाही दावा करत आहेत. पण सत्य का लपवलं जात आहे?

प्‍योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनबाबत चर्चांना उधाण आलं आहे. किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी जगभरात उत्सुकता आहे. जाणकारांच्या दाव्यानुसार, किम जोंग उनचा मृत्यू झाला आहे तर काही वृत्तानुसार किम जोंग उन कोमामध्ये आहे. या प्रकरणी उत्तर कोरियात एवढी गोपनियता बाळगली जात आहे की तिथल्या नागरिकांनाही सत्य काय आहे हे माहित नाही.

याआधीही हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीमुळे किम जोंग उन अतिशय आजारी असल्याचं किंवा त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र त्यानंतर एका खताच्या प्लान्टच्या उद्घाटनादरम्यान किम जोंग उन सार्वजनिकरित्या समोर आला होता. मात्र आता पुन्हा एकदा तो त्याचा मृत्यू झाल्याचा किंवा तो कोमामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

अखेर सत्य का लपवलं जात आहे? देशाच्या हुकूमशाहाच्या मृत्यूनंतर परिस्थिती बिघडू शकते. कारण आपल्या देशात किमची ओळख ही आधीच्या हुकूमशाहांच्या तुलनेत दयाळू म्हणून आहे, ज्याने अनेक कल्याणकारी पावलं उचचली आहेत. जगातील हुकूमशाहांवर पुस्तक लिहिणारे लेखक ख्रिस मिकुल यांच्या मते, जर किम जोंग उनचा मृत्यू झाला तर उत्तर कोरिया उद्ध्वस्त होईल. कारण तिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील, ज्या रोखणं कठीण होईल.

पत्रकार रॉय केली यांचं मत काय? दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती किम डे-जंग यांच्या कार्यकाळात अधिकारी असलेले चान्ग सॉन्ग-मिन यांच्या दाव्यानुसार, किम जोंग उन कोमामध्ये आहे. तर उत्तर कोरियात बराच काळ वास्तव्यास असलेले पत्रकार रॉय कॅली यांच्या मते, त्यांच्या देशात अशाप्रकारे गोपनियता बाळगली जाते की, तिथे राहणाऱ्यांनाही देशात काय सुरु आहे, याची माहिती नसते. डेली एक्स्प्रेससोबत केलेल्या बातचीतमध्ये ते म्हणाले की, "त्यांचा मृत्यू झाला असावा असं मला खरंच वाटत आहे, पण त्या देशाबाबत काहीच सांगू शकत नाही."

खरंच किम जोंग उनचा मृत्यू? ब्रिटिश आणि अमेरिकेच्या मीडियाने ही मिन यांच्या हवाल्याने एवढंच सांगितलं आहे की, किम जोंग उन कोमामध्ये आहे. उन कोमामध्ये असल्याचा अर्थ उत्तर कोरियासाठी एखाद्या आणीबाणीपेक्षा कमी नाही. उत्तर कोरियाच्या मीडियातही उनच्या काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. पण जर किम जोंग उनचा मृत्यू झाला असेल तर त्याचा उत्तराधिकारी कोण असेल, अशी चर्चा मात्र रंगू लागली आहे.

बहिण किम जोंग उनची उत्तराधिकारी? दक्षिण कोरियाची गुप्तचर यंत्रणा नॅशनल इन्टेलिजन्स सर्विस (NIS) ने म्हटलं होतं की, किम जोंग उन आपले सर्व अधिकार बहिण किम यो जोंगकडे सोपवेल. जोंग सध्या आपल्या भावाच्या राजकीय पक्षाची उपसंचालक आहे. तिच किम जोंग उनची उत्तराधिकारी असल्याचं समजतं. किम यो जोंग जरी सगळ्यांसमोर असली तर पडद्यामागे किम जोंग उनच्या हातातच सगळा कारभार असेल.

किम जोंग उन आणखी बराच काळ कोमामध्ये राहण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे त्याची बहिण किम यो जोंग सत्ता काबीज करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. जाणकारांच्या मते, किम यो जोंग ही आपल्या भावाप्रमाणेच अतिशय क्रूर हुकूमशाह बनू शकते. किम यो जोंग अतिशय महत्त्वाकांक्षी आणि स्‍मार्ट आहे. जर तिने सत्ता सांभाळली तर येत्या काही वर्षात ती फारच क्रूर सिद्ध होईल.

हुकूमशाहाचा मृत्यू झाल्यास काय होईल? किम जोंग उनचे आजोबा किम इल सुंग यांच्यापासून 1948 मध्ये दक्षिण कोरियात हुकूमशाहीची सुरुवात झाली. सुंगनंतर त्याचा मुलगा किम जोंग इल आणि त्यानंतर 2011 मध्ये वयाच्या केवळ 36 व्या वर्षी किम जोंग उन देशाचा हुकूमशाह बनला होता. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेनुसार उन आणि उसकी पत्नी री सोल जू यांना तीन मुलं आहेत. मात्र उनच्या मुलांचं वय सध्या फारच कमी आहे. म्हणजेच त्याचा मोठा मुलगा अवघ्या दहा वर्षांचा आहे.

अशा परिस्थित किम जोंग उनची बहिणच सत्तेवर बसण्यासाठी पहिली आणि तगडी उमेदवार आहे आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांचंही तिला समर्थन आहे. किम जोंग उननेच स्वत:नंतर बहिणीला दुसऱ्या कमांडचा दर्जा दिला आहे.

दक्षिण कोरियात किम जोंग उनचे आजोबा सुंग याचा अतिशय आदर आणि सन्मान केला जातो. जपानी शासकांपासून मुक्ती मिळवून देण्यात आणि उत्तर कोरिया स्वतंत्र देश बनवण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं. किम जोंग उनचे आजोबा आणि वडिलांच्या गोष्टी आणि फोटो सातत्याने प्रत्येक ठिकाणी दाखवले जातात. त्यांच्या योगदानाच्या कहाण्या देशात ऐकवल्या जात. तज्ज्ञांच्या मते सध्या उत्तर कोरियात वारसानुसार चालत आलेल्या हुकूमशाहीशिवाय पर्यात नाही.

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget