एक्स्प्लोर
WHO | जगभरात कोरोना लसीच्या समान वितरणासाठी डब्ल्यूएचओचा प्रोग्रॅम
जगभरात कोरोना लसीच्या समान वितरणासाठी डब्ल्यूएचओने नवीन प्रोग्रॅम हाती घेतला आहे. या अंतर्गत डब्ल्यूएचओने श्रीमंत देशांना सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे.
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गावरील लसीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रशियाने तर अधिकृतरित्या लस शोधल्याचे जाहीर देखील केले आहे. मात्र, नफेखारीमुळे ही लस गरीब देशांमधील पोहचण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेण्याचं ठरवलं आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या देशांना मदत करण्याचा इशारा डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी दिला आहे. यासाठी COVAX global vaccines facility लसी विकसित करण्यासाठी फंड उभारणार आहे.
डब्ल्यूएचओने जगभरातील गरिब देशांसाठी 2 अब्ज कोरोना संसर्गावरील लसीचे डोस तयार करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी सुबत्ता असणाऱ्या देशांना “लस राष्ट्रवादापासून होणार्या धोक्यांविषयी” इशारा दिलाय. त्यामुळे श्रीमंत देशांनी या चळवळीमध्ये सहभागी होऊन लस विकसित करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे.
काय आहे डब्ल्यूएचओ कार्यक्रम?
कोवॅक्स ग्लोबल वॅक्सीन फॅसीलिटी कार्यक्रमाअंतर्गत श्रीमंत देशांकडून फंड गोळा करुन लस विकसित करण्यात येणार आहे. ही लस कुठलाही नफा न घेता जदभरातील नागरिकांना याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत कोरोना लसीचे दोन अब्ज डोस तयार करण्यात येणार आहेत. 2021 च्या अखेरीस कोरोना वरील लसीला मान्यता मिळणार असल्याचा अंदाज एब्लूएचओने वर्तवला आहे.
Coronavirus | डब्ल्यूएचओचं हर्ड इम्युनिटीबाबत 'हे' मोठं वक्तव्य!
ऑगस्टच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. यात सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत देशांना देण्यात आली आहे. डब्ल्यूएचओ याचं नेतृत्व करत असून गावी लस आणि कोलिशन फॉर एपिडिमिक प्रिपेरेडेनेस इनोव्हेशन्स (सीईपीआय) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालणार आहे.
उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा होतोय कोरोना!
कोवॅक्स हा एका व्यापक प्रोग्रामचा भाग आहे, ज्यात कोविड 19 लस शोधणे हा मुख्य उद्धेश आहे. या सोबत या साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी लस, उपचार, निदान चाचण्या आणि इतर आरोग्यसेवा संसाधने व्यापकपणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करते.
Prakash Javdekar | अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी आता एकच परीक्षा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement