एक्स्प्लोर
Advertisement
'किल किम'... जपान आणि अमेरिकेचा मास्टरप्लॅन!
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला हादरवून टाकणारा हा हल्ला असेल आणि या कारवाईसाठी आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : उत्तर कोरियाच्या कुरापती थांबवण्यासाठी जपान आणि अमेरिकेनं आता मास्टरप्लॅन तयार केला आहे. 'किल किम' या ऑपरेशन अंतर्गत जपान आणि अमेरिका किम जोंग उनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला हादरवून टाकणारा हा हल्ला असेल आणि या कारवाईसाठी आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
5 नोव्हेंबरला डोनाल्ड ट्रम्प जपानला जाणार आहेत. हुकूमशहा किम जोंग उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवरच हा मास्टरप्लॅन आखल्याचं कळतं आहे.
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर अमेरिका आणि जपानच्या राजनैतिक अधिकारी सहमत झाले आहेत. त्यासाठी उत्तर कोरियावरील दबाव वाढवला जाणार आहे. मात्र ही रणनिती अयशस्वी ठरली, तर आगामी संकटांना सामोरं जाण्यासाठीही तयार राहायला हवं, असेही त्यांनी म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement