एक्स्प्लोर
इटलीत दोन ट्रेनची समोरासमोर धडक, 10 प्रवासी मृत्युमुखी
रोम : इटलीतील दक्षिण भागात दोन पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा प्रवासी मृत्यूमुखी पडले असून 12 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पुग्लिया आणि अँड्रिया या दोन भागांच्या मध्ये एकाच रुळावर दोन ट्रेन समोरासमोर आल्याने हा अपघात घडला. आकाशातून घेतलेला या अपघाताचा फोटो घटनेची भीषणता स्पष्ट करत आहे. वेगाने येत असलेल्या दोन्ही ट्रेनच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
ट्रॅकवर आणि दुतर्फा रेल्वेच्या अवशेषांचा खच पडला आहे. जखमींना आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. दोन शहरांना जोडणाऱ्या एकाच मार्गावरुन दररोज अनेक गाड्या जातात. त्यामुळे या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
भारत
Advertisement