Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा दहावा दिवस, संघर्ष सुरुच
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Background
Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.
Gaza Strip War Effect : इस्रायलच्या आवाहनानंतर गाझामधील लोकांचं पलायन
हमासकडून दक्षिण इस्रायल आणि तेल अवीववर रात्रभर रॉकेट डागण्यात आले. त्याच वेळी, इस्रायली सुरक्षा दलांनी गाझाच्या उत्तर भागात आणि हल्ले केले. इस्रायली लष्कराच्या मते, इस्रायलच्या आवाहनानंतर सुमारे 600,000 हून अधिक लोकांनी गाझा शहर आणि आसपासच्या परिसरातून पलायन केलं आहे.
Israel-Hamas War Live Updates: इस्रायल-हमास युद्ध जगासाठी धोक्याची घंटा
हमासने इस्त्रायलवर पहिल्या दिवशी केलेला हल्ला मानसिक युद्धतंत्राचा देखील भाग होता. दरम्यान, सध्याची परिस्थिती बघायची तर गाझा पट्टी परिसरातील वीज पुरवठांसह अनेक गोष्टींची कमतरता आहे. येत्या 24 तासांत इस्त्रायलकडून मोठा हल्ला करत गाझा पट्टीवर नियंत्रण घेण्याचा प्रयत्न देखील होताना दिसेल. मात्र, एखाद्या दहशतवादी संघटनेनं बलाढ्य समजल्या जाणाऱ्या सशस्त्र देशाला अशाप्रकारे कोंडीत पकडणं आणि गनिमी काव्याचा वापर करत गुप्तचर यंत्रणांना चकवा देत इतका मोठा हल्ला करणं जगाला धोक्याची घंटा निर्माण करणारा आहे.


















