एक्स्प्लोर
Advertisement
आयएसआयएसचा प्रमुख अल बगदादी ठार
सीरिया : दहशतवादी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी नाटोच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचं वृत्त आहे. मोस्ट वाण्टेड दहशतवादी बगदादीवर 25 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 160 कोटी रुपयांचं इनाम आहे.
इराणी मीडियानुसार, आयएसआयएसविरोधात अमेरिकेच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या हवाई हल्ल्यात अल बगदादी उत्तर सीरियाच्या रक्कामध्ये ठार झाला.
'रमजानच्या पाचव्या दिवशी बगदादी ठार'
अल-अकम या न्यूज एजन्सीनुसार, 'आयएसआयएस'चा खलीफा 'बगदादीचा खात्मा करण्यात आला. बगदादी रमजानच्या पाचव्या दिवशी हवाई हल्ल्यात मारला गेला. मात्र याबाबत अमेरिका किंवा इतर मित्र देशांकडून अद्याप कोणतंही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, मागील एक वर्षात अल बगदादी ठार झाल्याचं वृत्त आलं होतं. तसंच इराक आणि सीरियाचा ताबा असलेल्या परिसरात त्याला पाहिल्याचंही वृत्त होतं.
कोण आहे बगदादी?
- अल बगदादी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. अबु मुसाब अल-जरकावीच्या मृत्यूनंतर तो संघटनेचा प्रमुख बनला.
- 29 जून, 2014 रोजी बगदादीने इराक आणि सीरियाच्या बहुतांश भागावर ताबा मिळवून इस्लामिक स्टेटची घोषणा केली. तसंच स्वत:ला मुस्लिमांचा 'खलीफा' घोषित केलं होतं.
- अमेरिकेने या अतिरेक्यावर 160 कोटी रुपयांचं इनाम ठेवलं आहे.
बगदादी पीएचडी होल्डर!
- बगदादीचा जन्म 1971 मध्ये उत्तर बगदादच्या सामरामध्ये झाला होता. त्याचं खरं नाव अव्वाद इब्राहिम अली अल-बद्री आहे.
- संघटनेत त्याची ओळख बॅटलफिल्ड कमांडर आणि टेक्निशियन म्हणून आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तरुण दहशतवाद्यांमध्ये त्याचं विशेष आकर्षण आहे.
- बगदादीने इस्लामिक स्टडीजमध्ये पीएचडी केल्याचं म्हटलं जातं. इराकच्या बुक्कामध्ये अमेरिकेच्या प्रिझन कॅम्पमध्ये बगदादी चार वर्ष कैदेत होता.
- या कॅम्पमध्ये बगदादीने इतर दहशतवाद्यांशी संपर्क वाढवला. त्यानंतर 2009 मध्ये बुक्का डिटेन्शन कॅम्पमधून त्याला सोडण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement