एक्स्प्लोर
आयसिसचा नंबर दोनचा म्होरक्या अदनानी ठार
मुंबई: आयसिस या संघटनेचा नंबर दोनचा म्होरक्या अबू मोहम्मद अल अदनानीचा खात्मा झाला आहे. अमेरिकेनं त्याच्या मृत्यूला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.
पॅरिस, ब्राझिलसह बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कट अदनानीनं रचला होता. बगदादीनंतर तो आयसिस संघटनेचा प्रमुख समजला जात होता.
30 ऑगस्टला अल्बाब भागात झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा खात्मा झाला. आयसिस संघटनेनं याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं. मात्र, अमेरिकेनं आज त्यांच्या मृत्यूबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे.
सीरियात राहणारा अल अदनानी सुरुवातीपासूनच अमेरिकेचा कट्टर विरोधक होता. आयसिसमध्ये जाण्याआधी अदनानी अलकायदाचा दहशतवादी जरकावीच्या फार जवळ होता.
जरकावी ठार झाल्यानंतर 2005 साली अदनानी अमेरिकन लष्कराच्या हाती लागला होता. जवळजवळ पाच वर्ष त्याला अमेरिकेच्या लष्कराचा तळावर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2010 साली त्याला सोडण्यात आलं होतं.
सुटका झाल्यानंतर तो आयसिसचा प्रवक्ता झाला आणि 2014 सालापर्यंत तो बगदादीच्या सगळ्यात जवळचा मानला जाऊ लागला. बगदादीपेक्षाही अदनानी हा सगळ्यात खतरनाक असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे अदनानीच्या मृत्यूनं आयसिसला मोठा धक्का बसला आहे.
कोण होता अदनानी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement