एक्स्प्लोर

Iran Vs Israel War: इराण-इस्रायल युध्दाचा भारताला काय फटका बसणार? समजून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे

या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल ? भारतासमोर कोणती आव्हान उभी राहतील ? जाणून घेऊया सोप्या शब्दात . .

Israel Iran war: इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले आहे . दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत असून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत .ज्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत .आता मध्य पूर्वमध्ये सुरू असलेलं हे युद्ध केवळ दोन देशांमध्ये राहिलं नाही तर त्याचा संपूर्ण जगावर व्यापक परिणाम होणार आहे . इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या  संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल ? भारतासमोर कोणती आव्हान उभी राहतील ? जाणून घेऊया सोप्या शब्दात . .

विमान प्रवास महागणार

भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद आहे .दरम्यान इराक आणि इराणचे हवाई क्षेत्र हे बंद करण्यात आले आहे . या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या कोणत्याही भारतीय विमानाला मोठा वळसा घालून जावे लागेल . परिणामी इराण इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा फटका हवाई प्रवासाला बसू शकतो . भारतीय विमानांना लांब अंतर कापवे लागत असल्याने विमान भाडे वाढण्याची शक्यता आहे .

कच्च्या तेलाच्या किमती

इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत . इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ दोन दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे .जर इराण इजराइल युद्ध असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किमती आठ ते नऊ टक्क्यांनी वाढवू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे .या परिस्थितीत भारताच्या आयात बिलामध्ये वाढ होऊ शकते .  अल्पावधीत भारतावर इतका परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे .

पेट्रोलच्या किमती वाढणार

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20% तेल व्यापार होतो .ही सामुद्रधुनी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबस्थानशी जोडली गेली आहे .इराण आणि इज्रायलच्या युद्धामुळे जर या मार्गात अडथळे आले तर इराक,सौदी अरेबिया आणि युएईमधून येणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे .असे झाले तर भारताला तेल आयात करणे कठीण जाईल .ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील .

रुपया कमकुवत होईल

इराण इज्रायल युद्ध लवकर संपलं नाही तर डॉलरची मागणी वाढेल असं तज्ञांचे मत आहे .असे झाले तर भारतीय रुपयावर थेट दबाव वाढेल .हा दबाव वाढल्याने देशाच्या व्यापार तुटीत व चालू खात्यातील तुटीवरही याचा परिणाम होऊ शकतो .रुपयाचे मूल्य कमी झाले तर खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील .

भारतीय कामगारांसाठी संकट

भारतातील सुमारे एक कोटी लोक कामासाठी आखाती देशांमध्ये जातात .गेल्या वर्षभरात आखाती देशात कामासाठी गेलेल्या कामगारांनी 45 अब्ज डॉलर भारतात पाठवले .हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर होते .मात्र इराण इस्रायल युद्ध आणखी भडकले तर अशा परिस्थितीत तब्बल एक कोटींहून अधिक कामगारांचे काम धोक्यात येईल .ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल .

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
Embed widget