एक्स्प्लोर
इराणने खूप मोठी चूक केली, डोनाल्ड ट्रम्प संतापले
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता त्यामध्ये अजून भर पडली आहे. इराणने अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
वॉशिंग्टन डीसी : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता त्यामध्ये अजून भर पडली आहे. इराणने अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
इराणने आपले ड्रोन पाडल्यानंतर संतप्त झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने खूप मोठी चूक केल्याचे ट्वीट केले आहे.
ट्रम्प यांच्या ट्वीटनंतर इराणच्या लष्कर प्रमुखांनी आमचे लष्कर युद्धासाठी तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही देश आता युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे बोलले जात आहे. इराणने अमेरिकेचे MQ-4C ट्राइटन हे ड्रोन पाडले आहे. हे ड्रोन इराणच्या हवाई क्षेत्रात घुसले होते, असे इराणकडून सांगण्यात आले आहे. तर हे ड्रोन आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.Iran made a very big mistake!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 20, 2019
भारतावरही परिणाम इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर तणाव वाढला असून भारतीय नौदलाकडून ओमानच्या समुद्रात दोन युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. पर्शियन गल्फ आणि ओमानच्या समुद्रातून वाहतूक करणाऱ्या भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन संकल्प' सुरू केले आहे. भारतीय नौदलाचे पी-8 या विशेष विमानाद्वारे टेहळणी देखील ठेवण्यात येत आहे. व्हिडीओ पाहाIran made a very big mistake: Trump on US drone downing
Read @ANI Story | https://t.co/wkTyBC0spL pic.twitter.com/1MKbI4knjL — ANI Digital (@ani_digital) June 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement