(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indonesian Flight Feared Crashed: इंडोनेशियातील 'ते'विमान कोसळलं; विमानात 62 प्रवासी
जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात 10 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. पण अवघ्या एका मिनिटात ते 10 हजार फुटापेक्षा पण खाली आले आहे.
नवी दिल्ली : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर श्रीविजया एअरचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची दाट शक्यता आहे. बोईंग 737 प्रकारच्या या विमानात 62 प्रवासी होते. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात 10 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. पण अवघ्या एका मिनिटात ते 10 हजार फुटापेक्षा पण खाली आले आहे.
इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले की, बोईंग 737-500 विमानाने दुपारी 1:56 वाजता जकार्ताहून उड्डाण केले आणि दुपारी अडीचच्या सुमारास कंट्रोल टॉवरचा संपर्क तुटला. इंडोनेशियातील श्रीविजया एअरलाइन्सच्या या विमानात एकूण 56 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विमान पश्चिम कालीमंतनची प्रांतीय राजधानी पोंटियानकच्या दिशेने जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेले बोईंग विमान 26 वर्ष जुने होते होते.
Indonesian Flight Missing: इंडोनेशियन विमान बेपत्ता, 50 हून अधिक प्रवाशी असल्याची माहिती
रॉयटर्सच्या माहितीनुसार बचावकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की शहराच्या समुद्रात विमानाचे संशयास्पद अवषेश सापडले आहेत. स्थानिक तटरक्षक दलाच्या जहाजाच्या कमांडरने स्थानिक माध्यमांना सांगितले की, इंडोनेशियन किनाऱ्यावरील जावा समुद्रात विमानाचे अवषेश आणि काही मृतदेह आढळून आले आहेत. शोध आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे.
बोईंग 737-500 विमानाने सोकार्नो-हट्टा विमानतळावरुन उड्डाण केले होते. फ्लाइट ट्रॅकर वेबसाइट फ्लाइट्रॅडार 24 च्या माहितीनुसार, विमानाने एका मिनिटापेक्षा कमी वेळात 10,000 फूट उंची गाठली होती. श्रीविजय एअरलाईन्सने सांगितलं की, या घटनेसंदर्भात सर्व माहिती गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.