(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indonesian Flight Missing: इंडोनेशियन विमान बेपत्ता, 50 हून अधिक प्रवाशी असल्याची माहिती
Indonesian Flight Missing: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सुटल्यानंतर एक विमान बेपत्ता झालं आहे. श्रीविजय एअर बोइंग 737 हे विमान असून या विमानात 50 हून अधिक प्रवाशी असल्याची माहिती आहे.
Indonesian Flight Missing: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सुटल्यानंतर एक विमान बेपत्ता झालं आहे. श्रीविजय एअर बोइंग 737 हे विमान असून या विमानात 50 हून अधिक प्रवाशी असल्याची माहिती आहे. हे विमान पश्चिम कालिमॅटन प्रांतातून बोर्निओ बेटावरील पोंटियानॅककडे जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, श्रीविजया एयर बोइंग 737 जकार्ताहून निघाल्यानंतर वेस्ट कलिमनतन प्रांतापासून संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले.
इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले की, बोईंग 737-500 विमानाने दुपारी 1:56 वाजता जकार्ताहून उड्डाण केले आणि दुपारी अडीचच्या सुमारास कंट्रोल टॉवरचा संपर्क तुटला. इंडोनेशियातील श्रीविजया एअरलाइन्सच्या या विमानात एकूण 56 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विमान पश्चिम कालीमंतनची प्रांतीय राजधानी पोंटियानकच्या दिशेने जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेले बोईंग विमान 26 वर्ष जुने होते होते.
बोईंग 737-500 विमानाने सोकार्नो-हट्टा विमानतळावरुन उड्डाण केले होते. फ्लाइट ट्रॅकर वेबसाइट फ्लाइट्रॅडार 24 च्या माहितीनुसार, विमानाने एका मिनिटापेक्षा कमी वेळात 10,000 फूट उंची गाठली होती. श्रीविजय एअरलाईन्सने सांगितलं की, या घटनेसंदर्भात सर्व माहिती गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.