एक्स्प्लोर
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मालवणचे लिओ वराडकर
![आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मालवणचे लिओ वराडकर Indian Origin Gay Minister Leo Varadkar Leads Race For Ireland Prime Minister Latest News आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मालवणचे लिओ वराडकर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25113857/Leo-Varadkar-Ireland.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिंधुदुर्ग : आयर्लंडच्या भावी पंतप्रधानाच्या विजयासाठी गाऱ्हाणं मांडलं जात आहे. तेही मालवणी भाषेत आणि आयर्लंडच्या भावी पंतप्रधानांचं मूळ गाव असलेल्या सिंधुदुर्गात.
लिओ वराडकर. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे. अशोक वराडकर आणि पत्नी मरियम यांचं तिसरं अपत्य.
लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षण मंत्री आहेत. डबलीनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून 2003 साली त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. त्यानंतर फाइन गेल या ख्रिश्चन डेमोक्रेटिक पॉलिटिकल पार्टीतर्फे ते
राजकारणात आले. विशेष म्हणजे लिओ हे मंत्रीमंडळातले पहिले गे सदस्य आहेत.
2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.
वराडकर कुटुंबियांचं गावात घर आणि बागायती शेती आहे. त्यांची शेती आणि घर हे त्यांचे चुलत बंधू वसंत वराडकर सांभाळतात. लिओची आई मरियम आणि बाबा अशोक वराडकर वर्षातून एक-दोनदा मूळ गावी येतात.
गावी आल्यावर ते मालवणी पाहुणचार स्वीकारतात, त्यांना अजूनही मराठी भाषा, काही कोकणी शब्द बोलता येतात, निवडणूक जिंकल्यास लिओ मूळगावी येऊन देवीचं दर्शन घेणार, असं लिओ यांचे काका वसंत वराडकर सांगतात.
लिओ वराडकर जर आयर्लंडचे पंतप्रधान झाले, तर इतिहासाचं चाक उलटं फिरेल आणि ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, त्यावर आपला माणूस सत्ता गाजवेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)