एक्स्प्लोर
भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या
न्यूजर्सी : मूळ आंध्र प्रदेशातील असलेल्या एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसह तिच्या सात वर्षीय मुलाची अमेरिकेत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. न्यूजर्सीतील राहत्या घरी मायलेकांचे मृतदेह महिलेच्या पतीला आढळून आले.
40 वर्षीय शशिकला आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा अनिश साई यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. एन हनुमंत राव गुरुवारी ऑफिसवरुन परतले, तेव्हा आपल्या पत्नी आणि मुलाला मृतावस्थेत पाहून हादरले होते.
मायलेकाची गळा दाबून राहत्या घरी हत्या करण्यात आली. हनुमंत आणि शशिकला हे दोघंही सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहेत. शशिकला घरी राहूनच काम करायच्या. हे दाम्पत्य गेल्या नऊ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्याला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत भारतीयांच्या हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तेलंगणातील 32 वर्षीय एअरोनॉटिकल इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला यांची 23 फेब्रुवारीला गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तर 10 फेब्रुवारीला तेलंगणातीलच एका व्यक्तीची त्याच्या अपार्टमेंटमधील गराजमध्ये हत्या झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement