एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ललित मोदीला झटका, सेंट लुसियातील नागरिकत्व अर्जाला भारताचा विरोध
![ललित मोदीला झटका, सेंट लुसियातील नागरिकत्व अर्जाला भारताचा विरोध India Objects Lalit Modis Application For Citizenship Of Saint Lucia ललित मोदीला झटका, सेंट लुसियातील नागरिकत्व अर्जाला भारताचा विरोध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/14234316/lalit-1-573x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारतातून पलायन करुन लंडनमध्ये स्थायिक झालेला ललित मोदीला चांगलाच झटका लागला आहे. ललित मोदी सेंट लूसियाचं नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सीबीआयनं ललित मोदीच्या नागरिकत्वाच्या अर्जाचा जोरदार विरोध करुन त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कागदपत्र सेंट लुसिया इंटरपोलला पाठवले आहेत.
इंटरपोलच्या सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने इंटरपोलला ललित मोदीविरोधात रिपोर्ट पाठवले असून त्याला नागरिकत्व देण्यास विरोध केला आहे. ललित मोदीविरोधात भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. जेव्हा या प्रकरणांची चौकशी सुरु झाली त्यावेळी तो लंडनला पळून गेला.
ललित मोदीवर 125 कोटी अवैधरित्या परदेशात पाठवल्याचा गुन्हा चेन्नईमध्ये नोंदवण्यात आला आहे. त्याशिवाय ईडीनंही पैशांच्या अफरातफरीबाबबत त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
कसं मिळतं सेंट लुसियाचं नागरिकत्व:
सेंट लुसिया हा एक कॅरेबियन देश आहे. सेंट लुसियामध्ये CITIZENSHIP BY INVESTMENT याचवर्षी 1 जानेवरीपासून सुरु करण्यात आला आहे.
गुंतवणूक वाढावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, नागरिकता देण्याआधी त्या व्यक्तीविषयी संपूर्ण चौकशी केली जाईल.
सीबीआयकडून सेंट लुसियाला पाठविण्यात आलेल्या रिपोर्टमुळे ललित मोदीला नागरिकत्व मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)