एक्स्प्लोर

स्विस बँकेत इंग्लंडचा सर्वाधिक पैसा, भारत कितव्या स्थानावर?

नवी दिल्ली : स्विस बँकेत सर्वाधिक पैसा असणाऱ्या देशांच्या यादीत भारताची 88 व्या स्थानावर घसरण झाली आहे. तर इंग्लंड पहिल्या स्थानावर कायम आहे. परदेशातील इतर ठेवीदारांच्या रकमेच्या तुलनेत भारतीयांचा पैसा केवळ 0.4 टक्के असल्याचं स्विस नॅशनल बँक अर्थात एसएनबीने म्हटलं आहे. भारत 2015 मध्ये या यादीत 75 व्या,  तर 2014 मध्ये 61 व्या स्थानावर होता. भारताचा 2007 पर्यंत स्विस बँकेतील जगभरातील ठेवीदारांच्या यादीत पहिल्या 50 देशांमध्ये क्रमांक होता. तर 2004 मध्ये भारत 37 व्या स्थानावर होता. माहिती उघड केली जात असल्यामुळे स्विस बँकेतील भारतीय ठेवीदार दुसरीकडे पैसा ट्रान्सफर करु शकतात, असंही बोललं जातं. काळ्या पैशांविरोधात कारवाई सुरु झाल्यापासून भारतीयांचा स्वित्झर्लंडमध्ये हाँग काँग आणि सिंगापूरसारख्या केंद्रांच्या तुलनेत कमी पैसा आहे, असंही स्विस बँकेने म्हटलं आहे. अमेरिका या यादीत स्विस बँकेतील एकूण 14 टक्के रकमेसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या दहा देशांमध्ये वेस्ट इंडिज, फ्रांस, बहमास, जर्मनी, जर्सी, हाँग काँग आणि लक्झमबर्ग यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारतीयांचे स्विस बँकेत 4 हजार 500 कोटी रुपये आहेत. म्हणजेच एकूण जगभरातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत हा आकडा केवळ 0.4 टक्के एवढा आहे. जो 2015 मध्ये 0.8 टक्के एवढा होता. तर दुसरीकडे पाकिस्तानचाही स्विस बँकेत भारतीयांपेक्षा जास्त पैसा आहे. पाकिस्तान या देशांच्या यादीत 71 व्या स्थानावर आहे. काळ्या पैशांविरोधातील कारवाईचं यश पाहायचं असेल, तर स्विस बँकेची ताजी आकडेवारी पाहा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या भाषणात म्हटलं होतं. काळ्या पैशांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरु राहिल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र स्विस बँकेतील पैसा कमी झाला आहे. पण हा पैसा दुसरीकडे ट्रान्सफर केला जात असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा कमी होत असला तरी तो दुसरीकडे तर जात नाही ना, याचा शोध घेण्याचं आव्हान भारतासमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने  10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
मुंबईत स्क्रिझोफेनियाग्रस्त आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने  10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
मुंबईत स्क्रिझोफेनियाग्रस्त आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
PM Kisan : मोठी बातमी, पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
MAHARERA : महारेराचा 1950 प्रकल्पांना दणका, बँक खाती गोठवली, 10773 पैकी 5324 प्रकल्पांचा सकारात्मक प्रतिसाद
महारेराच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 1950 प्रकल्पांना स्थगिती देत दणका, बँक खाती गोठवली, कारण...
Mumbai Local Train: बदलापूर-खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळापत्रकात नेमके काय बदल होणार?
Horoscope Today 10 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget