एक्स्प्लोर
इमरान खान यांच्या शपथविधीसाठी मोदींना निमंत्रण?
इमरान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित केलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई : पाकिस्तानमधील निवडणुकीत इमरान खान यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. इमरान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित केलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
“इमरान खान यांच्या शपथविधीला नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क (SAARC) देशांच्या प्रमुखांनाही बोलावलं जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी इमरान खान यांचं विजयाबद्दल फोनद्वारे अभिनंदन केलं. हे एक चांगलं पाऊल आहे,” असं तहरीक-ए-इन्साफच्या एका नेत्याने म्हटलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी 2014 साली आपल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केलं होतं. मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील उपस्थित राहिले होते.
पाकिस्तान निवडणुकीत काय झालं?
पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इमरान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला.
दरम्यान, इमरान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 137 जागा त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे बहुमताचा मॅजिकल आकडा गाठण्यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement