एक्स्प्लोर
Advertisement
Pulwama Attack : नया पाकिस्तानच्या बाता मारणारा इम्रान खान दहशतवादाचा बापच
भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. भारताने पुरावे द्यावेत पाकिस्तान कारवाई करेल असा पोकळ दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. एबीपी माझा त्यांचा दावा पोकळ असल्याचं भावनेच्या भरात बोलत नाही, तर आमच्याकडे पाकड्यांच्या थापाडेबाजीचे आणि दुटप्पी वागण्याचा पुरावाही आहे.
मुंबई : भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. भारताने पुरावे द्यावेत पाकिस्तान कारवाई करेल असा पोकळ दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. एबीपी माझा त्यांचा दावा पोकळ असल्याचं भावनेच्या भरात बोलत नाही, तर आमच्याकडे पाकड्यांच्या थापाडेबाजीचे आणि दुटप्पी वागण्याचा पुरावाही आहे.
एबीपी माझाकडे असलेल्या व्हिडिओत दिसत आहे तो काळ्या कपड्यातला दाढीवाला कुणी सामान्य पाकिस्तानी नाही. तो आहे हाफिज सईदचा जवळचा साथीदार.. मुंबईवर २६/११चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर ए तोयबाचा म्होरक्या असणारा हाफिज सईद सध्या मोस्ट वॉन्टेड आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. लष्कर ए तोयबाचा बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्याने चलाखीनं संघटनेचं नाव बदललं. जमात उल दवा नावानं कारवाया सुरु केल्या. त्यावरही अमेरिकेनं बंदी घातली. त्यानंतर त्याला बहुधा त्याच्या आयएसआयमधल्या सूत्रधारांनी डोकं दिलं आणि त्यांनी फलाह ए इंसानियत फाऊंडेशन ही स्वयंसेवी संघटना सुरु केली. सध्या या संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरं, शाळा, प्रकाशन संस्थाही चालवल्या जातात.
या व्हिडीओत हाफिजच्या शेजारी बसलेला पांढऱ्या कपड्यातील दाढीवाला तरूण कुणी दहशतवादी किंवा सामान्य नागरिकही नाही. दहशतवाद्याशेजारी आरामात गप्पा मारताना दिसतोय शहरयार आफ्रिदी... तो इम्रान खान म्हणाला त्या नया पाकिस्तानच्या इम्रान खान मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे. अंतर्गत खात्याचा राज्यमंत्री. आता तुम्हाला वाटेल.. कदाचित तो त्यांना नया पाकिस्तान में अमन की नयी राह पर चलने का पैगाम घेऊन गेला असेल तर तसं नाही. हाफिज सईदचा दहशतवादी साथीदार आणि इम्रान खानच्या मंत्र्याच्या गप्पा पाकिस्तानात कायद्याचं नाही तर दहशतवाद्यांच्या फायद्याचंच राज्य चालतं हे उघड करणारं आहे.
हाफिजच्या साथीदारासोबत इम्रानच्या मंत्र्याच्या गप्पा
शहरयार आफ्रिदी, इम्रानचा मंत्री – हाफिज सईद साब से क्या दुष्मनी...
हाफिजचा साथीदार - इस्लामाबाद हाइकोर्ट ने आर्डर जारी किया. मिली मुस्लीम लिग को रजिस्टर करनेका. पाकिस्तान इलेक्शन कमिशन ने कहा, अमेरिका ने इसे आलमी दहशतगर्द तंजिम कर दिया. हमे पता चला है कि यह हाफिज सइद की तंजिम है...इसको हमे आलमी दहथलगर्द तंजिम में शामील कर रहे है...
शहरयार आफ्रिदी - इंशाल्लाह ...जब तक हम असेंब्ली में है...तहरिक ए इन्साफ है...तब तक कोई हाफिज सईद साहब को छेड़े...जो पाकिस्तान के लिए हर पल साथ देगा...कसाब देगा...हम उनका साथ देंगे...यह हमारा इमान है...हमारा इमान है...आप असेंब्ली में आइए...उपर बैठिए...देखिए...इंशाल्लाह
पाकिस्तान संसदेत तुम्ही या आणि ऐका आम्ही कशी साथ देतोय... इम्रान खानचा मंत्रीच असं बोलतोय...हाफिज सईदच्या साथीदाराला त्यामुळे आता इम्रान खान आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला... तुम्हीच आहात भारतात घातपात करणाऱ्या दहशतवाद्यांचे सर्वात मोठे साथीदार... तुमचं पाकिस्तान सरकारच आहे दहशतवाद्यांचा सर्वात मोठा अड्डा... निष्पांपांचे बळी घेणारे पाकिस्तान नव्हे तर पापस्तानच! आणि नया पाकिस्तानच्या बाता मारणारा इम्रान खान दहशतवादाचा बापच!!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement