एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींच्या ‘ब्रिक्स’मधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
डोकलाममधल्या सीमेवरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यानं दोन्ही देशांसाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

बीजिंग (चीन) : ‘ब्रिक्स’ परिषदेत प्लॅनरी सेशनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. 'ब्रिक्स' देशातील नेत्यांच्या बैठकीनंर प्लॅनरी सेशन पार पडलं. यात पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
- शांतता आणि विकासासाठी एकमेकांमध्ये सहकार्याची आवश्यकता आहे.
- ‘ब्रिक्स’ सहकार्यासाठी आधार बनली आहे. अनिश्चिततेकडे झुकणाऱ्या जगात स्थिरता आणि विकासासाठी ब्रिक्स महत्त्वाची ठरते आहे.
- कृषी, संस्कृती, पर्यावरण, ऊर्जा, क्रीडा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील आपण एकमेकांना सहकार्य करत आहोत.
- ब्रिक्समधील देश एकमेकांना भेटत आहेत, ज्यामुळे आपल्याला समजून घेणं अधिक शक्य होणार आहे.
- दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य, स्वच्छता, कौशल्य, खाद्य सुरक्षा, लैंगिक समानता, ऊर्जा आणि शिक्षण यांबाबतची धोरणं ‘मिशन मोड’मध्ये आहेत.
- महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांमुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते आहे.
- केंद्रीय बँकांच्या क्षमतेत आणखी वाढ करावी लागेल. आयएमएफसोबतच्या सहकार्यास प्रोत्साहन द्यायला हवं.
- ब्रिक्स देश इंटरनॅशन सोलर पॉवर कोएलेशनच्या माध्यमातून सौर उर्जेच्या ध्येयाला आणखी पुढे नेऊ शकतात.
- ब्रिक्सने रेटिंग एजन्सी सुरु करण्याची गरज आहे. जेणेकरुन विकसित देशांच्या स्वायत्त आणि कॉर्पोरेट संस्थांची आर्तिक गरजा पूर्ण करता येऊ शकतील.
आणखी वाचा























