काय सांगता? केवळ 20 इंच लांबीची गाय...बांग्लादेशच्या 'राणी'ची गिनीज बुकात नोंद
Guinness Book of World Records : जगातल्या सर्वात लहान गाईचा हा फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. या गाईची नोंद आता गिनीज बुकात करण्यात आली आहे.
Guinness Book of World Records : जगभरातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये घेतली जाते. आता बांग्लादेशातील अशाच एका वेगळ्या आणि आश्चर्यकारक असलेल्या गाईची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. बांग्लादेशात काही दिवसांपूर्वी राणी नावाच्या एका प्रसिद्ध गाईचं आकस्मित निधन झालं होतं. या गाईची लांबी केवळ 20 इंच म्हणजे 50.8 सेमी इतकी होती.
राणी नावाच्या या गाईला पहायला वेगवेगळ्या भागातून अनेक लोक यायचे. इतक्या लहान आकाराच्या गाईला पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचे. राणी गाईचा मालक असलेल्या काजी मोहम्मद अब सुफियान यांनी सांगितलं की, गेल्या सोमवारी त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून एक मेल आला होता. राणीचे नाव त्यामध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती त्या मेलमधून देण्यात आली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वेबसाईटवरही याची खात्री करण्यात आली आहे.
जगातल्या इतक्या लहान आकाराच्या या गायीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. या गाईचे काही दिवसांपूर्वी आकस्मित निधन झालं होतं.
भारतातील सर्वात लहान गाय केरळमध्ये
काही दिवसांपूर्वी राणी गाईच्या मालकाना ती जगातली सर्वात लहान गाय असल्याचा दावा केला होता. त्या आधी भारतात जगातली सर्वात लहान गाय असल्याचा दावा केला जात होता. भारतात केरळमध्ये सर्वात लहान गाय असून तिचे नाव माणिक्यम असं आहे. या गाईची लांबी केवळ 61 सेमी इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Brain Eating Amoeba : पाण्याशी संपर्क आला आणि 'ब्रेन इटिंग अमिबाने' बालकाचा जीव घेतला, अमेरिकेतील धक्कादायक घटना
- Internet Blackout : उद्यापासून iphone, Smart tv, playstaion वर इंटरनेट चालणार नाही, काय आहे यामागील कारणं?
- Gurugram : पत्नीच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवले आणि पाळत ठेवली; विचित्र स्वभावाच्या पतीवर गुन्हा दाखल