(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brain Eating Amoeba : पाण्याशी संपर्क आला आणि 'ब्रेन इटिंग अमिबाने' बालकाचा जीव घेतला, अमेरिकेतील धक्कादायक घटना
पाण्यामधून प्रसार होणाऱ्या 'ब्रेन इटिंग अमिबा'ने (Brain Eating Amoeba) बालकाचा जीव घेतला आहे. ब्रेन इटिंग अमिबा हा पाण्याच्या माध्यमातून मनुष्याच्या नाकावाटे शरीरात प्रवेश करतो.
Brain Eating Amoeba : टेक्सासमधील एका बालकाचा पार्कमध्ये खेळत असताना पाण्यातील ब्रेन इटिंग अमिबाशी (Brain Eating Amoeba) संपर्क आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वॉटर पार्कमधील स्प्लॅश पॅड्स म्हणजे स्प्रिंकलर्समधून येणाऱ्या पाण्याच्या तुषारांशी खेळत असताना या बालकाला ब्रेन इटिंग अमिबाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
टेरंट कन्ट्री पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्टनं सांगितलं आहे की, त्या पार्कमध्ये स्प्लॅश पॅड्समधून येणारे पाणी हे ब्रेन इटिंग अमिबाने युक्त असं होतं. त्याच्यामध्ये ब्रेन इटिंग अमिबाचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
काहींच्या मते, त्या बालकाच्या कुटुंबियांनी सोबत आणलेले पाणी हे ब्रेन इटिंग अमिबाने प्रदूषित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या बालकाचा जीव गेला असण्याची शक्यता आहे. 5 सप्टेंबरला त्या बालकाला एक वेगळ्या प्रकाराचा आजार झाला असल्याचं टेक्सासमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने टेक्सासमधील त्या पार्कच्या स्प्लॅश पॅड्समधून येणाऱ्या पाण्याची चाचणी केली.
ब्रेन इटिंग अमिबा हा पाण्याच्या माध्यमातून मनुष्याच्या नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. गेल्या महिन्यात अमेरिकेत ब्रेन इटिंग अमिबामुळे सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. 2010 ते 2019 पर्यंत अमेरिकेत अशा प्रकारच्या 34 केसेस समोर आल्या आहेत.
काय आहे ब्रेन इटिंग अमिबा?
ब्रेन इटिंग अमिबाचे वैज्ञानिक नाव हे नेग्लरिया फाऊलेरी (Naegleria fowleri) असं आहे. हवामान बदलाच्या संकटामुळे याचा संसर्ग पसरत असल्याचं सांगण्यात येतंय. हा घातक अमिबा मनुष्याच्या मेंदूत शिरकाव करतो आणि तो कुरतडायला सुरुवात करतो. या अमिबामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
कोरोनाच्या संकट काळात या अमिबाचा प्रसार हा उत्तर अमेरिकेतील काही राज्यांमध्ये झाल्याचं दिसून आला होता. ब्रेन इटिंग अमिबा हा पाण्याशी संबंधित असतो. पाणी हे रोजच्या आपल्या जीवनातील रोजचा घटक असल्याने त्यापासून दूर राहता येत नाही.
ब्रेन इटिंग अमिबा कुठे सापडतो?
आपल्या मेंदूत शिरकाव करून मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा अमिबा तळे, नदी, झरे तसेच इतर प्रकारच्या ताज्या पाण्यात सापडतो. हा एक सिंगल सेल लिव्हिंग ऑर्गॅनिजम आहे. याचे संक्रमण जीवघेणं असून यामध्ये मृत्यू निश्चित मानला जातोय.
नेग्लरिया फाऊलेरी (Naegleria fowleri) ची लक्षणं काय आहेत?
नेग्लरिया फाऊलेरी (Naegleria fowleri) म्हणजे ब्रेन इटिंग अमिबाचा संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, ताप येणं आणि उलट्या होणं ही लक्षणं दिसून येतात. तसेच गळा आखडून येणं, मानसिक आजारपण आणि मनुष्य कोम्यामध्ये जाणं हेही घडू शकतं. वेळेत या रोगाचं निदान झाल्यास मनुष्याचा जीव वाचू शकतो.
महत्वाच्या बातम्या :
- Internet Blackout : उद्यापासून iphone, Smart tv, playstaion वर इंटरनेट चालणार नाही, काय आहे यामागील कारणं?
- Gurugram : पत्नीच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवले आणि पाळत ठेवली; विचित्र स्वभावाच्या पतीवर गुन्हा दाखल
- Greta Thunberg : 'ब्ला, ब्ला, ब्ला...'; हवामान बदलावर केवळ पोकळ आश्वासनं देणाऱ्या विकसित देशांवर ग्रेटा थनबर्ग कडाडली