एक्स्प्लोर

Google Doodle | गुगलचा डूडलद्वारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखा सलाम

गुगलने (Google) कोरोनाला पराभूत करण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांसाठी हे खास डूडल (Doodle) बनवले आहे. या माध्यमातून सर्व डॉक्टर्स, नर्स आणि मेडिकल स्टॉफला 24 तास अथक सेवा दिल्याबद्दल धन्यवाद देण्यात आले आहेत.

मुंबई : गुगलकडून कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत दिवसरात्र लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखा सलाम करण्यात आला आहे. जागतिक महामारी कोरोना व्हायरसचा विषय घेऊन गुगलने दुसऱ्यांदा डूडल बनवलं आहे. यावेळी गुगलने (Google) कोरोनाला पराभूत करणाऱ्या डॉक्टरांसाठी हे खास डूडल (Doodle) बनवले आहे. या खास गुगल डूडल (Google Doodle) मध्ये एका व्हिडीओच्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स, नर्स आणि मेडिकल स्टॉफला 24 तास अथक सेवा दिल्याबद्दल धन्यवाद देण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी केल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. गुगलच्या या डूडलला क्लिक केल्यानंतर एक व्हिडीओ ओपन होतो. या व्हिडीओमध्ये वेगवेगळे डॉक्टर लोकांना सल्ले आणि सूचना देताना दिसत आहेत. 'ही वेळ आहे, देशात एकजूट आणायची. शांत राहायची. आपला परिवार आणि देशाचं रक्षण आता केवळ आपल्या हातात आहे. या महामारीत सर्वाधिक गरजेचं आहे की, आवश्यक वस्तूंचा वापर त्याच जागी व्हावा जिथं त्या वस्तूंची सर्वाधिक गरज आहे. जसं की, मास्क आणि सॅनिटायझर.' असं या व्हिडीओत डॉक्टर सांगत आहेत. यात डॉक्टर म्हणतात 'आम्ही आपल्यासाठी काम करत आहोत, आपण घरातच राहा.' आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुगलने आभार मानले आहे. हे सर्वजण करत असलेल्या कामाबद्दल गुगलने डूडलद्वारे आभार मानले आहे. गुगलने याआधी देखील 2 एप्रिल रोजी डूडल तयार केले होते. या डूडलद्वारे गुगलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले होते. यात गुगलने तयार केलेल्या डूडलचे प्रत्येक अक्षर हे घरामध्येच राहून कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कामात व्यग्र असल्याचा संदेश देत होते. पाहा गुगलच्या डूडलमधील व्हिडीओ जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18500 लाख पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1,853,155 वर पोहोचली आहे. तर 114,247 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तर मृतांच्या आकड्यांमध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात लॉकडाऊन असूनही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 8447 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 7409 कोरोना बाधित आहेत. तर 764 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Prize Chemistry 2026 : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
Fly dubai Incident Marathi News: ‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
Who is Hamam Al-Hamami: कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget