एक्स्प्लोर
G7 Summit | काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तानचा द्वीपक्षीय मुद्दा, मध्यस्थी करणाऱ्या ट्रम्पना मोदींचं उत्तर
फ्रान्सच्या बेलारित्जमध्ये जी-7 परिषद आयोजित करण्यात आलीये. या परिषदेदरम्यान मोदी आणि ट्रम्प या दोघांचीही भेट झाली. कलम 370 हटवल्यानंतरची मोदींची ट्रम्प यांच्यासोबतची ही पहिलीच भेट होती.
बेलारित्ज (फ्रान्स) : काश्मीरच्या मुद्द्यावरुन मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच पाकिस्तानला ठणकावलं आहे. काश्मीरचा हा भारत-पाकिस्तानचा प्रश्न द्वीपक्षीय आहे. त्यामुळे मध्यस्तीचा प्रश्नच येत नाही असं म्हणतं मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.
फ्रान्सच्या बेलारित्जमध्ये जी-7 परिषद आयोजित करण्यात आलीये. या परिषदेदरम्यान मोदी आणि ट्रम्प या दोघांचीही भेट झाली. कलम 370 हटवल्यानंतरची मोदींची ट्रम्प यांच्यासोबतची ही पहिलीच भेट होती. यापुर्वी काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाकमध्ये आपण मध्यस्ती साठी तयार असल्याचं विधान ट्रम्प यांनी केलं होतं. पण मोदींनी ही मध्यस्ती फेटाळून लावली आहे. तसच हा मुद्दा आम्ही आपापसात मिटवू आणि चर्चेने सोडवु असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे. तसेचं आमच्या प्रश्नासांठी इतर कुठल्याही देशाला आम्ही कष्ट देणार नाही असंही मोदीं म्हणाले.
UNCUT G7 Summit | काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तानचा द्वीपक्षीय मुद्दा, मोदींचं ट्रम्पना उत्तर | ABP Majha
डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, पाकिस्तानला झटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसमोरच मध्यस्थीच्या मुद्द्यावर यूटर्न घेतला. काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाकप्रश्नी मोदींनी तुम्ही कष्ट घेऊ नका असं सांगितलं. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ओके म्हणत दोन्ही देशांचे पंतप्रधान त्यांचे प्रश्न चर्चेतून सोडवण्यास समर्थ आहेत, अशी जोड देत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीच्या आशेवर बसलेल्या पाकला जोरदार दणका दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement