एक्स्प्लोर
Advertisement
प्रवासी-चालकाचा वाद 15 जणांच्या जीवावर, चीनमध्ये बस नदीत कोसळली
महिलेचं स्टॉपवर उतरणं राहून गेलं, त्यामुळे तिने तात्काळ चालकाला बस थांबवायला सांगितली. त्याने नकार दिल्यामुळे चिडलेल्या महिलेने तिचा मोबाईल चालकाच्या डोक्यात मारला
बीजिंग : चीनमध्ये सार्वजनिक वाहतूक करणारी बस यांगत्से नदीत कोसळून भीषण अपघात झाला. महिला प्रवासी आणि बसचालकाचा वाद 15 प्रवाशांच्या जीवावर बेतला.
चीनमध्ये रविवारी झालेल्या बस अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या सिटी बसने अचानक लेन कट केली. समोरुन येणाऱ्या कारला उडवत पुलाचा कठडा तोडून ती बस नदीत कोसळली. बसमध्ये ड्रायव्हरसह 15 प्रवासी होते.
चार दिवसानंतर बस बाहेर काढण्यात आली, तेव्हा 13 जणांचे मृतदेह हाती आले, तर दोघे बेपत्ता होते. सीसीटीव्ही फूटेज आणि बसमधील ब्लॅक बॉक्समुळे या अपघातामागील कारण समोर आलं आहे.
लियू नावाच्या महिलेचं स्टॉपवर उतरणं राहून गेलं, त्यामुळे तिने तात्काळ चालकाला बस थांबवायला सांगितलं. त्याने नकार दिल्यामुळे चिडलेल्या महिलेने तिचा मोबाईल चालकाच्या डोक्यात मारला. त्यावर चालकानेही प्रतिकार केला.
वादावादीत चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पुलाचा कठडा तोडून 160 फुटांवरुन नदीत पडली. बस कठडा तोडताच व्हिडिओ बंद झाला, मात्र प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.
#Video Accident in Chongqing, southwestern China left 13 dead, 2 missing and the bus some 262 feet deep in Yangtze River. A brief video shows that a brawl between a passenger and a bus driver led to the bus plunging off a bridge. pic.twitter.com/FE5WKxixTZ
— China Focus (@China__Focus) November 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement