एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावरील FBI ची छापेमारी Nuclear कागदपत्रांच्या शोधासाठी, खळबळजनक खुलासा

Raids On Donald Trump's House : एफबीआयनं नुकतेच फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो' या घरावर छापेमारी केली होती. यादरम्यान एफबीआयनं तिथून कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स जप्त केले.

Raids On Donald Trump's House : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी आता मोठी खुलासा झाला आहे. एफबीआयनं आण्विक कागदपत्रांसह (Nuclear Documents) इतर वस्तूंच्या शोधात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरावर छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टन पोस्टनं सूत्रांच्या हवाल्यानं हा मोठा दावा केला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) 'मार-ए-लागो' (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केली होती. यादरम्यान एफबीआयनं तिथून कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स ताब्यात घेतले होते. इतकंच नाही तर एफबीआयच्या सूत्रांनी द न्यूज वीकमधून खुलासा केला आहे की, ट्रम्प घरी नसताना हे छापे मुद्दाम टाकण्यात आले होते. ट्रम्प यांच्या उपस्थितीचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांना होती. तसेच, ट्रम्प या छापेमारीचा फायदा आपल्या राजकीय फायद्यासाठीही करु शकतात, अशीही शक्यता अधिकाऱ्यांना होती. त्यामुळेच ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत छापेमारी करण्यात आली होती. 

अधिकृत कागदपत्रांच्या शोधासाठी छापेमारी  

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर फ्लोरिडामध्ये आणलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी संबंधित अधिकृत कागदपत्रं शोधण्यासाठी एफबीआयनं छापेमारी केल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. सध्या न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरोधातील दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिलं प्रकरण आणि कागदपत्रं हाताळण्यासंदर्भातील दुसरं प्रकरण, यासंदर्भात सध्या चौकशी सुरु आहे. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेनं या प्रकरणात ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.

FBI च्या मते, एजन्सी प्रेसिडेंशियल रेकॉर्ड्स अॅक्ट आणि वर्गीकृत साहित्य हाताळणी कायद्यांच्या संभाव्य उल्लंघनांची चौकशी करत आहे. नॅशनल आर्काइव्हज अँड रेकॉर्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NARA) ने 2022 मध्ये व्हाईट हाऊसच्या रेकॉर्डचे 15 बॉक्स जप्त केले. हे बॉक्स 'मार-ए-लागो'ला (डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्लोरिडातील निवासस्थान) पाठवले गेले. त्यावेळी NARA ने सांगितलं की, नियमांनुसार कागदपत्रांनी भरलेले हे बॉक्स ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले, तेव्हा नॅशनल आर्काइव्हजला पाठवायचे होते.

ट्रम्ह म्हणाले होते, हा तर काळा दिवस 

दुसरीकडे, ट्रम्प यांनी FBI च्या छाप्याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, एफबीआय अधिकाऱ्यांनी फ्लोरिडातील पाम बीचवर असलेल्या 'मार-ए-लागो'वर छापा टाकून निवासस्थान ताब्यात घेतलं होतं. ट्रम्प म्हणाले होते, "ही आपल्या देशासाठीची काळी वेळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. हा प्रकार म्हणजे, न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर करण्यासारखं आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतचत काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतचत काढला पळ, म्हणाली...
Kiran Mane : 'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar PC | 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीनचीट ABP MajhaHiraman Khoskar | हिरामण खोसकर यांनी विधान परिषदेत कोणाला मतदान केलं? ABP MajhaTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट Top 50 News ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतचत काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतचत काढला पळ, म्हणाली...
Kiran Mane : 'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
झोमॅटोवर केली ऑर्डर, पण घरी पोहोचलेच नाहीत 133 रुपयांचे मोमोज; आता ग्राहकाला मिळाले 60 हजार रुपये, काय घडलं?
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर, 12 लाख वारकऱ्यांची गर्दी, चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम
Embed widget