एक्स्प्लोर
39 वर्षीय इमॅन्युएल मॅकराँ फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष!

AFP PHOTO
पॅरिस: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युएल मॅकराँ यांची निवड झाली आहे. 39 वर्षीय मॅकराँ हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये इमॅन्युएल मॅकराँ यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळं या निवडणुकीत त्यांचाच विजय होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. त्यानुसार त्यांनी 80 लाख 50 हजार 245 मतं म्हणजे एकूण मतांच्या 61.3 मतं मिळवत राष्ट्राध्यक्ष पदाची शर्यत जिंकली.
इमॅन्युएल मॅकराँ हे अवघ्या 39 वर्षांचे आहेत. फ्रान्सच्या इतिहासातला सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मॅकराँ यांना मिळणार आहे. 2004मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर 2007 मध्ये अर्थमंत्रालयाच्या समित्यांचं काम त्यांनी पाहिलं. 2012 ते 2014 या कालावधीत राष्ट्राध्यक्षांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. नंतर 2014 ते 2016 या काळात ते फ्रान्सचे अर्थमंत्री होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
