Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो ड्रोन हल्ला, इराणच्या खामेनींच्या निकटवर्तीयाची अमेरिकाला खुली धमकी
Donald Trump Threat: इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार जवाद लारीजानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची धमकी दिली आहे.

Iran Death Threat to Donald Trump: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांचे सल्लागार जवाद लारीजानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जिवे मारण्याीच धमकी दिली आहे. ते म्हणाले की असं होऊ शकतं की जेव्हा ट्रम्प त्यांच्या अलिशान घरात मार-ए-लागो मध्ये उन्हात बसले असतील त्यावेली त्यांना गोळी लागू शकते. इराण इंटरनॅशनल वेबसाईटच्या नुसार जेव्हा उन्हामध्ये ट्रम्प पोटावर झोपलेले असतील तेव्हा त्यांच्यावर छोट्या ड्रोनचा हल्ला होऊ शकतो, हे खूप सोपं आहे, असं लारीजानी म्हणाले. अयातुल्लाह खामेनी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
बल्ड पॅक्टकडून निधी उभारणी
ब्लड पॅक्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन फंड उभारला जात आहे. खामेनी यांचा अपमान करणाऱ्यांचा आणि खामेनींचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी फंड उभारला जात आहे. वेबसाईटचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत 27 मिलियन डॉलर्सचा निधी उभारला आहे. त्यांचं ध्येय 100 मिलियन डॉलर्स उभारण्याचं आहे. वेबसाईटवरील उल्लेखानुसार ते त्या लोकांना बक्षीस देणार आहेत जे अल्लाहचे दुश्मन आणि खामेनींचं जीवन संकटात टाकणाऱ्यांना न्याय देतील.
पाश्चिमात्य देशांच्या दुतावासाबाहेर निदर्शनांची अपील
इराणच्या रिवॉल्यूशनरी गार्डसशी संबंधीत फार्स वृत्तसंस्थेनं एका अभियानाला दुजोरा दिला आहे. ज्यामध्ये धार्मिक समुहांना पाश्चिमात्य देशांच्या दुतावासांच्या बाहेर आणि शहरांमध्ये निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर मोहेरबेह सारख्या इस्लामी कायदे लावले पाहिजे. इराणच्या कायद्यानुसार मोहेरबेह म्हणजेच अल्लाहच्या विरुद्ध युद्ध हा गंभीर गुन्हा मानला जातो, ज्यामध्ये मृत्यू ही शिक्षा असते.
इराण सरकारनं हात झटकले
इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांच्याशी चर्चा करताना तो फतवा सरकारनं किंवा खामेनींनी काढला नसल्याचं म्हटलं. मात्र, खामेनींच्या अधिपत्याखालील कायहान वृत्तपत्रानं ते वक्तव्य फेटाळला आहे. ते काही अकॅडमिक मत नसून धर्माच्या रक्षणासाठी धार्मिक आदेश असल्याचं म्हटलं. त्या वृत्तपत्रानं इशारा दिला की भविष्यात अशी एखादी ठिणगी पडली तर त्याचा परिणाम खतरनाक असेल.त्यामध्ये शेवटी म्हटलं की 'इस्लामिक रिपब्लिक इस्त्रायलला रक्तात बुडवेल'.
ट्रम्प यांच्या हत्येच्या धमकीनं लोक नाराज
इराणचे माजी खासदार गोलामअली जाफरजादे इमेनाबादी यांनी कायहानच्या भूमिकेवर टीका केली आहे. मला विश्वास नाही की कायहानचे संपादक शरियतमदारी इराणी आहेत. ट्रम्प यांच्या हत्येबाबत बोलल्यानं इराणच्या जनेतवर दबाव वाढेल, असं इमेनाबादी म्हणाले. यावर कायहान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेणं ही राष्ट्रीय मागणी झाली इसून इमेनाबादी यांचं वक्तव्य इराणच्या मूल्यांसोबत जुळत नसल्याचं म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प 2020 मध्ये इराकमध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचे आदेश दिल्यानंतर इराणच्या हल्ल्यांच्या निशाण्यावर आहेत. गेल्या वर्षी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या खुलाशानुसार इराणच्या रिवॉल्युशनरी गार्डसने ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता.
























