Donald Trump : तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Donald Trump On Elon Musk: डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्यावर आरोप सुरु ठेवले आहेत. एलन मस्क यांच्या मनात अध्यक्षांच्या कार्यालयाप्रती अनादराची भावना होती.

Donald Trump VS Elon Musk: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातील वाद मिटण्याची चिन्ह दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातील वादात संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मस्क यांच्यासोबत संबंध सुधारण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांना इशारा दिला की जर मस्क त्यांच्या टॅक्स कपातीच्या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या रिपब्लिकनच्या विरोधात डेमोक्रॅटिक उमेदवारांना आर्थिक मदत करत असतीलत तर याचे गंभीर परिणाम होतील आणि हे खूप गंभीर परिणाम असतील, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध संपले आहेत, असं म्हटलं आहे. गे. अमेरिकी राष्ट्रपति ट्रंप ने कहा कि एलन मस्क के साथ उनके रिश्ते अब खत्म हो गए हैं.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प एनबीसी न्यूजसोबत फोनवर मुलाखत देताना म्हणाले, जर ते असं करत असतील तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. मात्र त्यांनी याचे नेमके काय परिणाम होतील हे सांगितलं नाही. ते फक्त म्हणाले की ते जर असं करणार असतील तर त्यांना अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं गेलं की तुम्हाला एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत की नाहीत. यावर ट्रम्प यांनी नाही असं उत्तर दिलं.
टेस्ला आणि स्पेसेक्सच्या सीईओसोबत त्यांचे संबंध संपलेत का विचारलं असता त्यांनी हा मी असं मानतो, असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प म्हणाले की मस्क यांच्यासोबत लवकर चर्चा करावी, असं काही नियोजन नाही. मी दुसऱ्या कामात व्यस्त आहे. माझी त्यांच्यासोबत चर्चा करण्याची इच्छा नाही, असं ते म्हणाले.
ट्रम्प यांचे मस्क यांच्यावर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्यावर अध्यक्ष कार्यालयाचा अपमान केल्याचा, अनादर केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मला वाटतं ही गोष्ट वाईट आहे, कारण ती अनादरपूर्ण होती, तुम्ही अध्यक्ष कार्यालयाचा अनादर करु शकत नाही.























