एक्स्प्लोर

Dominique Pelicot : बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; कोर्टात 72 जणांची ओळख पटताच आता नराधम नवरा म्हणतो...

बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 72 जणांची ओळख पटवली आहे. 51 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये फायरमन, लॉरी चालक, नगरपरिषद, बँक कर्मचारी, जेल गार्ड, नर्स आणि पत्रकारांचा समावेश आहे.

Dominique Pelicot : फ्रान्समध्ये एका नराधम पतीने पत्नीला अंमली पदार्थ पाजून 72 जणांना बलात्कार करण्यासाठी बोलावल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे. डॉमिनिक असे त्या नराधम पतीचे नाव आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पोलिसांनी 91 बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 72 जणांची ओळख पटवली आहे. त्यापैकी 51 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये फायरमन, लॉरी चालक, नगरपरिषद, बँक कर्मचारी, जेल गार्ड, नर्स आणि पत्रकार यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी हा गुन्हा एकदा तर काहींनी सहा वेळा केला आहे.

माझ्या कृत्याचा मला पश्चाताप

डॉमिनिक कोर्ट रूममध्ये उपस्थित असलेल्या 50 आरोपींबद्दल बोलत होता. त्याने त्यांना बोलावून आपल्या पत्नीवर बलात्कार केला होता. डॉमिनिक म्हणाला की, "माझ्या पत्नीसोबत असे घडले नसावे. मी तिच्यासोबत खूप आनंदी होतो. मला माहित आहे की माझा गुन्हा अक्षम्य आहे पण तरीही मी माझी पत्नी, मुले आणि नातवंडांची माफी मागतो. मी "माझ्या कृत्याचा मला पश्चाताप होत आहे."

आरोपीची पत्नी गिसेल पेलिकोटही न्यायालयात हजर 

सुनावणीदरम्यान डॉमिनिकने सांगितले की, त्याचे बालपण खूप वाईट होते. तो 9 वर्षांचा असताना एका पुरुष नर्सने त्याचा विनयभंग केला होता. सुनावणीवेळी आरोपीची पत्नी गिसेल पेलिकोटही न्यायालयात हजर होती. ती म्हणाली, "माझ्यासाठी हे सर्व ऐकणे खूप कठीण आहे. मी 50 वर्षे अशा माणसासोबत राहत होते, तो असे काही करू शकेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला."

मला अत्याचाराचे व्यसन लागले

'मला अत्याचाराचे व्यसन होते' डॉमिनिकने संपूर्ण सुनावणीदरम्यान वारंवार पुनरुच्चार केला की तो आपल्या पत्नीचा द्वेष करत नाही. त्याचे तिच्यावर वेडेपणाने प्रेम होते. यावर गिसेलचे वकील स्टीफन बॅबोनो यांनी विचारले की, जर त्याचे आपल्या पत्नीवर इतके प्रेम होते तर तो तिचे शोषण का थांबवू शकला नाही? यावर डॉमिनिक म्हणाला, "मी अनेकवेळा हा गुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मला याची सवय लागली होती. मला याची गरज भासली. मला माहीत आहे की मी थांबायला हवे होते."

मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप 

पत्नीशिवाय डॉमिनिकवरही आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याच्या लॅपटॉपमधून त्याच्या मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे सापडली आहेत. मात्र, डॉमिनिकने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, पत्नीशिवाय त्यांनी कुटुंबातील कोणाचेही वाईट केले नाही. डॉमिनिकने सांगितले की, त्याने 2010 मध्ये पत्नीचे शोषण करण्यास सुरुवात केली. मग तो इंटरनेटवर एका मेल नर्सला भेटला ज्याने त्याला त्याच्या पत्नीला औषध देण्याचे सुचवले. यानंतर डॉमिनिकने पॉर्न वेबसाइटवर अज्ञात लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. पत्नीच्या शोषणाचे व्हिडिओही तो बनवत असे.

यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी डॉमिनिकविरुद्ध सुनावणी सुरू झाली होती. फ्रान्स 24 नुसार, डॉमिनिकवर दररोज रात्री आपल्या पत्नीला ड्रग्स देऊन तिच्यावर अनेक अज्ञात पुरुषांकडून बलात्कार केल्याचा आरोप आहे. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी सुरू राहणार आहे. रिपोर्टनुसार, आरोपी आणि महिलेच्या लग्नाला 50 वर्षे झाली आहेत. महिलेचे वय 72 वर्षे आहे. दोघांनाही 3 मुले आहेत. आता या प्रकरणाची जनसुनावणी अविग्न न्यायालयात सुरू झाली आहे. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी  चालणार आहे. या प्रकरणाची सुनावणी बंद दरवाजाआड व्हावी, असे मला वाटत नसल्याचे महिलेने सांगितले. तिने लपून राहावे अशी गुन्हेगारांची इच्छा होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Center Sushma Andhare :छगन भुजबळ मराठा-औबीसी वादाचे बळी. सुषमा अंधारेंनी सगळंच काढलंZero Hour on Chhagan Bhujbal : मला खेळणं समजले का? भुजबळ आक्रमक, अजित पवारांवर संतापलेZero hour Uddhav Thackeray and Devendra Fadnavis:उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय ठरलं?Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Video: विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Embed widget