Coronavirus | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विषाणू पुन्हा रिअॅक्टिव्ह होतो का?
दक्षिण कोरियात कोरोनामुक्त झालेल्या 91 जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे शरीरातील कोरोना विषाणू पुन्हा रिअॅक्टिव्ह झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जीनेवा : जागतिक आरोग्य संघटना कोरोनाविषाणूच्या संसर्गातून बरे होऊन दुसऱ्यांदा लागण होणाऱ्या रुग्णांच्या रिपोर्ट्सवर लक्ष ठेवून आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जिनेवात कोरोनाविषाणूच्या संसर्गाबाबत खुलासा केला आहे की, संघटना अशा कोविड19 रुग्णांच्या रिपोर्ट्सना मॉनिटर करत आहे, ज्यांची टेस्ट ते बरे झाल्यावर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. म्हणजे विलगीकरणादरम्यान उपचारानंतर ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे ठरत होते, असे ज्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती ते पुन्हा कोविड19 पॉझिटिव्ह कसे काय? यासाठी त्याच्या रिपोर्ट्सवर डब्लूएचओतर्फे लक्ष ठेवलं जाणार आहे.
कोरोना विषाणूची लागण दुसऱ्यांदा होऊ शकते का?
दक्षिण कोरियात 91 रुग्ण पूर्ण बरे झाल्याचे ठरवलेले असताना त्यांची नवीन कोरोना टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले. कोरिया सेन्टर फॉर डीसिज कंट्रोल एन्ड प्रिव्हेंन्शनचे संचालक (Jeong Eun-kyeong) यांच्या मते हा विषाणू पुन्हा रिअॅक्टिवेट झाला असावा. रुग्णाला दुसऱ्यांदा लागण झाली नसावी. जिनेवा स्थित जागतिक आरोग्य संघटनेने सिओलहून याबाबत रिपोर्ट्स मागवले असल्याचे रॉयटर्सला माहिती देत स्पष्ट केले की, "संघटनेला जाणीव आहे, ज्या रुग्णांची कोविड19 साठी पीसीआर टेस्ट (पोलिमेर्स चेन रिएक्शन टेस्ट) निगेटिव्ह आली होती, अशा रुग्णाची काही दिवसांनी घेतलेली टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे."
“आम्ही तज्ज्ञांकडून हे समजून घेतले, की प्रत्येक रूग्णाच्या केसची माहिती गोळा करण्याच्या कामावर मेहेनत घेत आहोत. हे महत्वाचे असते की टेस्टिंगसाठी संभावीत रूग्णांचे सॅम्पल्स घेताना, योग्य ठरवलेल्या पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे”.
रुग्णांच्या क्लिनिकल व्यवस्थापनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे एका रुग्णाला हॉस्पिटलमधून तेव्हाच डिस्चार्ज करता येतं जेव्हा डॉक्टरच्या देखरेखीत बरा झालेल्या त्या रुग्णाच्या (24 तासाच्या अंतराने) घेतलेल्या दोन्ही टेस्ट्स निगेटिव्ह येतात. सध्या सुरु असलेल्या अभ्यासावरुन कोविड19ची मध्यम प्रमाणात लागण झाल्यापासून त्या रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीत बरं होण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ते हे जाणून आहेत की रुग्णालयात बरे झालेल्यांपैकी काही रुग्णांची पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येते, पण या विषाणूचा संसर्ग पूर्ण नाहीसा होण्यासाठी किती वेळ लागतो, हे समजून घेण्यासाठी बरे झालेल्या रुग्णाच्या सॅम्पल्सचे कलेक्शन शास्त्रशुद्ध पद्धतीनेच होणे गरजेचे आहे.
Corona Effect | महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, विविध विभागात नोकर भरतीवर बंदी
दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते नवीन कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याबाबत बऱ्याच बाबी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत, या संसर्गजन्य रोगाबाबत शोध घेणं अजून सुरुच आहे. कोविड19 नवीन रोग आहे, या विषाणूबाबत कुठल्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी या संसर्गजन्य रोगावर जास्त माहितीची गरज आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले.
Lockdown 3 | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट