Russia Ukraine War : 'धोका कायम आहे, मात्र आम्ही लढत राहू'; रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया
Russia Missile Attack on Ukraine : रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं (Missile Attack) डागत मोठा हल्ला केला आहे. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Volodymyr Zelensky Reaction : रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं (Missile Attack) डागत मोठा हल्ला केला आहे. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रशियाकडून (Russia) युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु आहेत. रशियाकडून युक्रेनला (Ukraine) असणारा धोका कायम आहे. मात्र आम्ही लढत राहून. मागे हटणार नाही शत्रूला तितक्याच ताकदीने उत्तर देऊ असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्रं (Missile Attack) डागल्याने युक्रेनमध्ये मोठं नुकसान झालं आहे. सध्या युक्रेनियन सरकारकडून हे नुकसान भरून काढत डागडुजीचं काम सुरु आहे, अशी माहितीही झेलेन्स्की यांनी दिली आहे.
झेलेन्स्की यांचं युक्रेनियन नागरिकांना सतर्क राहण्याचं
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत युक्रेनियन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. झेलेन्स्की यांनी व्हिडीओ जारी करत म्हटलं आहे की, 'रशियाच्या हल्ल्यात झालेलं नुकसान भरून करत देशभरात डागडुजीचं काम सुरु आहे. रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं डागली. यामधील 43 मिसाईल युक्रेनियन सैन्यानं पाडली. याशिवाय रशियाच्या 24 ड्रोनपैकी 13 युक्रेनने पाडले. दर दहा मिनिटांनी युक्रेनवर रशियाकडून हल्ले करण्यात येत आहेत. अनेक निष्पापांचा बळी जात आहे. त्यामुळे मी युक्रेनच्या नागरिकांना विनंती करतो की, त्यांनी सरकारने आखून दिलेले नियम पाळावेत.'
युक्रेन हार मारणार नाही : व्लादिमीर झेलेन्स्की
झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही लढतोय. युक्रेनियन सैनिक आणि हवाई दलाचे आभार. त्यांनी ही लढाई अद्याप सुरु ठेवली आहे. युक्रेन हार मारणार नाही किंवा थांबणार नाही. युक्रेनला घाबरवणं शक्य नाही. शत्रू रणांगणात आमच्यासोबत लढू शकत नाही, म्हणून त्यांच्याकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण युक्रेन घाबरणार नाही. युक्रेन सरकारकडून एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. काळजी घ्या, सतर्क राहा, नियम पाळा. युक्रेनवर आणि युक्रेनच्या सैन्य दलावर विश्वास ठेवा. विजय आपलाच आहे.'
क्रीमियामधील स्फोटाचा बदला घेण्यासाठी हल्ला
क्रीमिया या रशियाच्या ताब्यातील शहरातील एका पुलावर स्फोट झाला. क्रीमियामधील स्फोट आणि लायमन शहरावर युक्रेनने पुन्हा मिळवलेला ताबा यामुळे रशिया अधिक खवळला आहे. क्रीमियातील हा पूर रशियन सैन्याला सामान आणि युद्धसामग्री पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र या पूलावर स्फोट झाला. या स्फोटासाठी रशियाने युक्रेनला जबाबदार ठरवलं आहे. मात्र युक्रेनने क्रीमियातील पुलावर झालेल्या स्फोटासंबंधित रशियाने केलेले आरोप फेटाळले आहेत. यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या क्षेपणास्त्रं हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरात मोठं नुकसान झालं आहे.