एक्स्प्लोर

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप रॅन्समवेअरने जगभरातील देशांना निशाना बनवलं आहे. यामध्ये भारत आणि युरोपचा समावेश आहे. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातलाच, शिवाय बँका तसंच इतर कंपन्यांसह ब्रिटीश सरकारचं मंत्रालयही बंद करण्यात आलं आहे. या व्हायरसने ग्राहक, शिपिंग, हवाई, तेल आणि गॅस कंपन्यांनवर हल्ला केला आहे. जाणकारांच्या मते, मंगळवारी रॅन्समवेअरने मॉन्डेल्ज, मर्क आणि मेर्स यांना निशाणा बनवलं आहे. अँटीव्हायरस सॉफ्टअवेअर पुरवणाऱ्या एव्हिरा या कंपनीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पीटरॅप हा 'पेट्या' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. पेट्याने 20 नामांकित कंपन्यांच्या कम्युटर स्क्रीन लॉक केल्या होत्या, ज्या अनलॉक करण्याच्या मोबदल्यात 300 डॉलरची मागणी केली आहे. रॅन्समवेअर हल्लेखोरांचं शस्त्र यूके आणि रशियातील तेल कंपन्या, ऊर्जा तसंच हवाई वाहतुकीसंबंधित भारताच्या सहाय्यक कंपन्याही या व्हायरसच्या बळी ठरले. रॅन्समवेअरसारख्या सायबर हल्ल्याने थेट पैसे उकळणं सोपं होतं. त्यामुळे आता हे रॅन्समवेअर आधुनिक हल्लेखोरांचं शस्त्र बनत आहे. रायगडच्या जेएनपीटीवर काम ठप्प या व्हायरसमुळे रायगडच्या जवाहर लाल नेहरु पोर्ट ट्रस्ट कामकाजही ठप्प झालं आहे. जेएनपीटवर युरोपची सगळ्यात मोठी कंपनी एपी मॉलर मर्स्क काम करते. जेएनपीटीवरील 18 लाख कंटेनर ही कंपनी ऑपरेट करते. मात्र व्हायरसने हल्ला केल्याने सध्या कंपनीचं काम ठप्प आहे. युक्रेनला सर्वाधिक फटका युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. युक्रेनमधील वीज कंपन्या, सरकारी कार्यालय, बँकांच्या संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनची सेंट्रल बँक, सरकारी वीज वितरक कंपनी यूक्रेनेर्गो, विमान कंपनी एंतोनोव्ह, पोस्ट कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. इतकंच नाही तर पेट्रोल पंपांवरही कामकाज थांबवण्यात आलं आहे. रशियातील तेल कंपन्यांच्या तक्रारी रशियातील तेल कंपनी रॉसनेफ्ट आणि डॅनिश शिपिंग कंपनी मैयास्कनेही तांत्रिक अडचणींची तक्रार केली आहे. या सायबर हल्ल्यामुळे अनेक युनिट्सना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं ट्वीट कंपनीने केलं आहे. संबंधित बातम्या रॅन्समवेअर अटॅक करुन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्यांची निराशा सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय कराल? भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget