एक्स्प्लोर
Advertisement
Corona Vaccine Update | जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने कोरोना लसीच्या मानवी चाचण्या थांबवल्या!
स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे अमेरिकेतील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने कोरोना लसीच्या मानवी चाचण्या काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.
Corona Vaccine Update: कोरोना लसीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील जॉन्सन आणि जॉन्सनने अचानक काही काळासाठी कोविड-19च्या लसीच्या मानवी चाचण्या थांबवली आहे. स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्याचं जॉन्सन आणि जॉन्सनने सांगितले.
जॉन्सन अॅसण्ड जॉन्सननंही कोरोनावर लस निर्माण केली आहे. या लसीच्या मानवी चाचण्या सुरु होत्या, पण अचानक एक स्वयंसेवक आजारी पडल्याने कंपनीने कोरोना लसीवरील चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, असं जॉन्सन अॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आलं आहे.
जॉन्सन आणि जॉन्सनने सांगितले की, कंपनी स्वयंसेवकांचा आजार समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच कंपनीच्या क्लिनिकल आणि सेफ्टी डॉक्टर यांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र डेटा मॉनिटरींग बोर्ड मूल्यांकन करत आहे.
दरम्यान पूर्वीच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोविड-19च्या लसीच्या स्वयंसेवकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रमाणात दिसून आल्या होत्या. कंपनीने हा दावा सुरवातीच्या आणि मध्यल्या काळातील मानवी चाचण्यांनंतर केला होता. सीएनएनच्या मते, दोन्ही टप्प्यांतील मानवी चाचण्यांचे निकाल बर्यापैकी चांगले आल्याचे सांगितले होते. तसेच असेही सांगण्यात आले की कोरोना लसीच्या एका डोसमुळे सर्व 800 स्वयंसेवकांवर जास्त प्रभावी प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. चाचणीच्या अंतरिम निकालांमधून असे दिसून आले की कोरोनाच्या लसीचा डोस चांगली रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात आणि ते सुरक्षित असल्याचेही आढळले. जेणेकरुन कोरोना लसीच्या मानवी चाचण्या मोठ्या गटांवर करता येतील. जुलैमध्ये माकडांवर या लसीची चाचणी केल्यानंतर चांगला प्रतिसाद आला आणि त्यानंतर कंपनीला बरेच प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर अमेरिकन सरकारच्या मदतीने कंपनीने कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध शेवटचा टप्प्यात 60 हजार लोकांवर मानवी चाचण्या करण्यात सुरुवात केली. VIDEO | राज्यातील कोरोनाची आकडेवारी काय सांगते? संबंधीत बातम्या Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल BLOG | कोरोनाची लस '80 हजार कोटी'?Johnson & Johnson is pausing all dosing in its coronavirus vaccine trials due to an unexplained illness in a study participant: Reuters
— ANI (@ANI) October 13, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
क्राईम
Advertisement