एक्स्प्लोर

Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस

आजपासून ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या लशीच्या मानवी चाचण्याची सुरुवात मुंबईतील केइएम रुग्णालयात सुरु झाली. आज पहिल्या दिवशी केवळ तीन जणांना लस टोचली जाणार आहे.

मुंबई : खऱ्या अर्थाने आज मुंबईत कोरोना विरोधातील लशीचा अनुभव 'मुंबईकरांनी' घेतला. हो, आजपासून ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या लशीच्या मानवी चाचण्याची सुरुवात केइएम रुग्णालयात सुरु झाली आहे. आज पहिल्या दिवशी केवळ तीन जणांना लस टोचली जाणार आहे. येत्या 15 दिवसांत ही मानवी चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे. या ट्रायलमध्ये 100 स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वयंसेवकांसोबत गुप्तता पाळण्याबाबत करार करण्यात आला आहे, त्यामुळे त्याचे नाव आणि व्यवसाय याबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी या चाचण्यांमध्ये लंडन येथील मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एका व्यक्तीला त्रास झाल्याने ह्या चाचण्या काही काळापुरत्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या आठवड्यापासून या कामास सुरुवात करण्यात आली. आज लस टोचली गेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी उत्पादन करण्याकरिता करार झाला आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचण्या महाराष्ट्रात काही रुग्णालयात करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुबंईत, महापालिकेच्या अखत्यारीतील नायर आणि केइएम रुग्णालयात या चाचण्या करण्यात येणार आहे.

Covid-19 vaccine | कोरोनावर भारतीय लस राहणार 'इतकी' टक्के प्रभावी; आयसीएमआरची माहिती

याप्रकरणी, केइएम रुग्णालायचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगितले कि, "आज पहिल्या दिवशी केवळ तीन स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात येणार आहे. त्यापैकी एकाला लस देऊन झाली आहे. या स्वयंसेवकाच्या ओळखीबाबत गुप्तता पाळण्यात येणार आहे. तसा करार करण्यात आला आहे. जे कुणी पात्र स्वयंसेवक होते त्यांना मानवी चाचणी करण्याकरिता बोलविण्यास आजपासून सुरुवात केली आहे. त्यांना लस दिल्यानंतर सुद्धा एक तास थांबिविले जाते आणि मगच घरी पाठविले जाते. लस टोचणी करता आमचे विविध शाखेचे या कामाशी संबंधित डॉक्टर येथे उपस्थित असतात."

ते पुढे असेही म्हणाले कि, "या चाचणीत 100 पैकी 20 जणांना प्लॅसिबो (कोणतेही औषध नसते त्या वाइल्समध्ये ) लस देण्यात येणार आहे. परंतु, हे आम्हालाही माहिती नाही कोणत्या वाइल्स मध्ये प्लॅसिबो लस आहे. फक्त कोडींग नंबर आहे तो त्या स्वयंसेवकाच्या पुढे टाकण्यात येणार आहे. ह्या वाइल्स जेथून आल्या आहेत. तेथूनच अशा प्रकारचे 100 डोस पाठविण्यात आल्या आहे. प्लॅसिबो लस ठेवण्यामागे तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होते. एक काळानंतर ह्याची सर्वांची चाचणी करण्यात येते. या मानवी चाचणीची सर्व माहिती आम्ही आयसीएमआरला (ICMR) देणार आहोत. ते आणि आम्ही याचा अभ्यास करू. अशा पद्धतीने ट्रायल घेण्याचा अनुभव आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांना आहे."

Corona Vaccine : कोरोनाविरोधी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीला KEM रुग्णालयात सुरुवात

अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटिश बायोफार्मसुटिकल्स कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन केले आहे. या लसीचा पहिला आणि दुसरा मानवी चाचण्यांचा टप्पा पार पडला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, ही लस घेतलेल्या व्यक्तीस या लसीचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो अडथळा आता दूर झाला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याकरिता देशातील 10 संस्थांची निवड केली आहे. याकरिता 1600 निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. भारतातील 10 संस्थांपैकी मुंबईतील केइएम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. प्रत्येकी केंद्रावर 100 निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकात 20 ते 50 वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर अनेक परदेशी औषधं निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस काढत असल्याचे दावे केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरु केले असून पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांचे निकाल विज्ञान जगतासमोर ठेवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचण्यांच्या टप्प्याचे काही कंपन्यांचे कामही सुरु झाले आहे.

WEB EXCLUSIVE | भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस डिसेंबर-जानेवारीत : डॉ. गिल्लूरकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा
'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा
Vishal Patil Sangli Loksabha : संपत्तीमध्ये वाढ अन् कर्जाचा सुद्धा भार हलका झाला; सांगलीच्या विशाल पाटलांची संपत्ती किती कोटी?
संपत्तीत वाढ अन् कर्जाचा सुद्धा भार हलका झाला; सांगलीच्या विशाल पाटलांची संपत्ती किती कोटी?
Chandrapur lok Sabha Election: चंद्रपुरात मतदान केंद्रावर राडा,  प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याने कार्यकर्ते संतप्त
चंद्रपुरात मतदान केंद्रावर राडा, प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याने कार्यकर्ते संतप्त
घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 
घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP MajhaChandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?Mahesh Kharade : महेश खराडे यांनी घोड्यावर स्वार होत भरला उमेदवारी अर्जVare Niwadnukiche : वारे निवडणुकीचे लोकसभा निवडणुकींच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा
'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा
Vishal Patil Sangli Loksabha : संपत्तीमध्ये वाढ अन् कर्जाचा सुद्धा भार हलका झाला; सांगलीच्या विशाल पाटलांची संपत्ती किती कोटी?
संपत्तीत वाढ अन् कर्जाचा सुद्धा भार हलका झाला; सांगलीच्या विशाल पाटलांची संपत्ती किती कोटी?
Chandrapur lok Sabha Election: चंद्रपुरात मतदान केंद्रावर राडा,  प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याने कार्यकर्ते संतप्त
चंद्रपुरात मतदान केंद्रावर राडा, प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याने कार्यकर्ते संतप्त
घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 
घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती? 
सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा काही संबंध नाही, सांगलीच्या उमेदवारीवर काय म्हणाले जयंत पाटील? 
सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा काही संबंध नाही, सांगलीच्या उमेदवारीवर काय म्हणाले जयंत पाटील? 
सामन्यापेक्षा मैदानात उपस्थित असणाऱ्या मुलीचीच अधिक चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
सामन्यापेक्षा मैदानात उपस्थित असणाऱ्या मुलीचीच अधिक चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका
'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका
Sangli Loksabha : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
Embed widget