Covid 19 : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, एका महिन्यात 40 टक्के लोकांना संसर्ग; भारतातील स्थिती काय?
China Corona : चिनी महामारी विशेष तज्ज्ञ झेंग गुआंग यांनी सांगितले आहे की, तेथील बहुतेक शहरांमध्ये 50 टक्के लोकांना कोविड -19 संसर्ग झाला आहे. त्यामुळे चीनमधील सुमारे 40 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाली आहे.
Coronavirus Outbreak in China : चीनमध्ये (China) कोरोनाचा उद्रेक (Covid19 Surge) सुरुच आहे. कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एशिया टाइम्सने हेल्थ एक्सपर्ट्सच्या अहवालानुसार माहिती दिली आहे की, गेल्या एका महिन्यामध्ये चीनमधील सुमारे 40 टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चिनी महामारी विशेष तज्ज्ञ झेंग गुआंग यांनी सांगितले आहे की, चीनमधील बहुतेक शहरांमध्ये 50 टक्के लोकांना कोविड -19 संसर्ग झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात चीनमधील सुमारे 40 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
जगभरात 665 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग
चायनीज सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे (CDC) माजी मुख्य शास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी माहिती दिला आहे की, चीनमध्ये अपेक्षेपेक्षाही वेगाने कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. चीनी CDC च्या अंतर्गत कागदपत्रांनुसार, गेल्या वर्षी 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान, 248 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली होती. एशिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत जागतिक स्तरावर कोविड संसर्गाची एकूण संख्या 665 दशलक्षांवर पोहोचली आहे, तर 6.69 दशलक्ष लोकांचा या कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात ओमायक्रॉनचे 11 सब व्हेरियंट
जगातील कोरोनाचा धोका वाढता भारताने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विमानतळवर आतंरराष्ट्रीय प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असून प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग तसेच रँडम कोविड चाचणी करण्यात येत आहे. त्याशिवाय चीन, थायलंडसह सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. देशातील सर्व विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. 24 डिसेंबरपासून आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉनचे भारतात 11 सब व्हेरियंट आढळले आहेत. दरम्यान, एकूण 124 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
भारतातील कोरोनाची स्थिती काय?
भारतात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे (XBB 1.5 Variant) पाच आणि बी.एफ.7 व्हेरियंटचे (B.F.7 Variant) पाच रुग्ण आढळले आहेतकोरोना विषाणूच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असले, तरी येथील परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील संसर्ग दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात गुरुवारी 188 नवे रुग्ण आढळले होते आणि 2,554 सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या
कोरोना विषाणूमुळे व्यक्तीच्या शुक्राणूवर परिणाम होतो, AIIMS च्या अभ्यासातील दावा