(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Sub Variant In India: धोका वाढतोय, भारतात ओमायक्रॉनचे 11 सब व्हेरियंट आढळले
Omicron Sub Variant In India: चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटने हाहा:कार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत, तर शेकडो जणांचे प्राण जात आहे.
Omicron Sub Variant In India: चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटने हाहा:कार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत, तर शेकडो जणांचे प्राण जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश सतर्क झाले आहेत. जगातील कोरोनाचा धोका वाढता भारताने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विमानतळवर आतंरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय चीन, थायलंडसह सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. 24 डिसेंबरपासून आतापर्यंत विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 11 सब व्हेरियंट आढळले आहेत. तर एकूण 124 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासादरम्यान ओमायक्रॉनचे 11 सब व्हेरियंट मिळाले आहेत. या सर्व व्हेरियंटचे रुग्ण याआधीही भारतात आढळले आहेत. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर ते 3 जानेवारी यादरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या चाचणीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे 11 सब व्हेरियंट आढळले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर ते तीन जानेवारी यादरम्यान, 19 हजार 227 नमूण्यांचं परिक्षण करण्यात आले. यामध्ये 124 आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये कोरोना झाल्याचं समोर आलेय. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. पॉझिटिव्ह 124 रुग्णांपैकी 40 चे जीनेम सीक्वेंसिंगचे रिपोर्ट समोर आले आहेत. यामध्ये XBB.1, XBB बीएफ 7.4.1 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे अधिक रु्गण आढळले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले होते. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतीय सार्स-सीओवी-2 जीनोमिक्स संघ (इन्साकॉग) यांच्या आकडेवारीनुसार, भारतात आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन रुग्ण गुजरात आणि एक एक रुग्ण राजस्थान आणि कर्नाटकमध्ये आढळले होते. हे रुग्ण एक्सबीबी.1.5 वेरियंट ओमायक्रॉनच्या एक्सबीबी वेरियंटसारखे होते. अमेरिकेत आढळत असलेल्या कोरोना रुग्णामध्ये 44 टक्के रुग्ण एक्सबीबी आणि एक्सबीबी.1.5 या सब व्हेरियंटचे आहेत. चीनमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये खबरदारी घेतली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.