(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | जगभरात 36 लाख 40 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त, तर मृतांची संख्या अडिच लाख पार
कोरोना व्हायरसपुढे अख्खं जग हतबल आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे अडिच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हातपाय पसरले आहेत. कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या अडिच लाखांवर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये 78377 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर 3,877 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरातील कोरोनाची स्थिती
जगभरातील एकूण कोरोनाच्या रूग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. तर एक चतुर्थांश कोरोना बाधितांचा मृत्यू अमेरिकेमध्ये झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेन कोविड-19मुळे सर्वाधिक प्रभावित झालेला दुसरा देश आहे. जिथे 25,428 लोकांचा मृत्यू झाला असून 248,301 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर यूके तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 29,079 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 211,938 एवढी आहे. त्यानंतर यूके, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देश सर्वाधिक प्रभावित आहेत.
पाहा व्हिडीओ : पुण्याच्या मुठा नदीच्या पात्रात निरनिराळ्या पक्षांचा मुक्त विहार, प्रदूषण घटल्याने जमले नवे पाहुणे | स्पेशल रिपोर्ट
- इंग्लंड : एकूण रूग्ण 190,584, एकूण मृत्यू 28,734
- फ्रान्स : एकूण रूग्ण 169,462, एकूण मृत्यू 25,201
- जर्मनी : एकूण रूग्ण 166,152, एकूण मृत्यू 6,993
- रूस : एकूण रूग्ण 145,268, एकूण मृत्यू 1,356
- टर्की : एकूण रूग्ण 127,659, एकूण मृत्यू 3,461
- ब्राझील : एकूण रूग्ण 107,844, एकूण मृत्यू 7,328
- इराण : एकूण रूग्ण 98,647, एकूण मृत्यू 6,277
- चीन : एकूण रूग्ण 82,880, एकूण मृत्यू 4,633
- कॅनडा : एकूण रूग्ण 60,772, एकूण मृत्यू 3,854
- बेल्जियम : एकूण रूग्ण 50,267, एकूण मृत्यू 7,924
जर्मनी, रूस, ब्राझीलसह 9 देशांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येने एक लाखांचा आकडा पार केला आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटेन) यांसारख्या देशांमध्ये 20 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा 70 हजारांजवळ पोहोचला आहे. चीन टॉप-10 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विषाणू पुन्हा रिअॅक्टीव्ह होतो का?
लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी