एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरात एक लाख 14 हजार जणांचा मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?

संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं आहे. अशातच जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या 18 लाख पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 12 हजारांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18500 लाख पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1,853,155 वर पोहोचली आहे. तर 114,247 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तर मृतांच्या आकड्यांमध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, इटलीमधील मृतांच्या आकड्यात गेल्या तीन आठवड्यांपासून घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया कोणत्या देशात काय परिस्थिती...

न्यूयॉर्कमध्ये तासांत 758 लोकांचा मृत्यू

अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात मागील 24 तासांत 758 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू क्युमो यांनी सांगितले की, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. पण काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 11 एप्रिल रोजी 758 लोकांचा मृत्यू झाला होता. राज्यात कोविड-19चा 1,80,458पेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला होता. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 9,385 एवढी आहे. संपूर्ण अमेरिकेतील मृतांचा आकडा 22,115 आणि संसर्ग झालेल्यांचा आकडा 560,433 एवढा आहे.

पाहा व्हिडीओ : चप्पल आणि बुटांद्वारेही कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका

इटलीमध्ये आतापर्यंत 19,899 लोकांचा मृत्यू

अमेरिकेनंतर कोरोनाचा प्रादूर्भाव इटलीमध्ये पाहायला मिळतो. इटलीमध्ये आतापर्यंत 19,899 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या 1,56,363 वर पोहोचली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 34,211 रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. इटलीमध्ये तीन आठवड्यांमध्ये रविवारी मृतांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी इटलीमध्ये 431 लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये 14,393 लोकांचा मृत्यू

फ्रान्समध्ये या महामारीमुळे 14,393 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 132,591 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, मागील तासांमध्ये मृतांच्या संख्येत कमतरता आली आहे. मंत्रालयाने सांगितले की मागील एक दिवसात 315 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक दिवसापूर्वी 345 लोकांचा मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त आयसीयूमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत चौथ्या दिवशी कमतरता दिसून आली आहे.

Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू

ब्रिटनमध्ये 10,612 लोकांचा मृत्यू

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 10,612 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या 84,279 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं आढळल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे.

स्पेनमध्ये कोविड-19मुळे 17,209 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोना बाधितांची संख्या 166,831वर पोहोचली आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 3,341 लोकांचा मृत्यू

चीनमध्ये आतापर्यंत या महामारीमुळे 3,341 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या एकूण 82,160 वर पोहोचली आहे. यामध्ये 77,663 लोक बरे झाले आहेत. चीनमध्ये अद्याप कोणताही मृत्यू झालेल्याती माहिती नाही.

संबंधित बातम्या : 

 Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले!

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 14 March 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषदEknath Shinde Holi 2025 : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धळवड, नातावासह उपमुख्यमंत्र्यांची मजामस्तीABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Embed widget