एक्स्प्लोर

Coronavirus World Update | जगभरात कोरोनाच्या 83 हजार नव्या रूग्णांची नोंद; गेल्या 24 तासांत 7 हजारांहून अधिक मृत्यू

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटापुढे हतबल झालं आहे. दिवसागणित जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जर नव्या रूग्णांबाबत बोलायचे झाले तर जगभरात 83 हजारांहून अधिक कोरोनग्रस्तांचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच या जीवघेण्या व्हायरसमुळे 7 हजारांहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 2,082,372 वर पोहोचली आहे. तर या व्हायरसमुळे बळी गेलेल्यांचा आकडा 134,560 वर पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेवर झाला आहे. या व्हायरसचा संसर्ग 6 लाखांहून अधिक लोकांना झाला आहे. तर 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादूर्भाव पाहायला मिळतो. न्यूयॉर्क शहर कोरोना व्हायरसचं केंद्र बनलं आहे. याच कारणामुळे न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे.

जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती :

देश एकूण रूग्ण नवीन रूग्ण एकूण मृत्यू गेल्या 24 तासांत मृत्यू
अमेरिका 644,055 30,172 28,526 2,479
स्पेन 180,659 6,599 18,812 557
इटली 165,155 2,667 21,645 578
फ्रान्स 147,863 4,560 17,167 1,438
जर्मनी 134,753 2,543 3,804 309
ब्रिटन 98,476 4,603 12,868 761

अमेरिकेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक टेस्ट

जगभरातील सर्वाधिक कोरोना व्हायरसच्या टेस्ट अमेरिकेमध्ये करण्यात आल्या आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 3,258,879 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत जर एखादी व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं तर त्याच व्यक्तीची तपासणी अनेकदा करण्यात येते. अमेरिकेनंतर जर्मनी सर्वाधिक टेस्ट करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत 1,728,357 कोरोना व्हायरसच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर रूस, इटली आणि यूएईचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे 1,517,992, 1,117,404, 767,000 कोरोना व्हायरसच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत चीन सर्वात पुढे आहे. चीनमध्ये आतापर्यंत 77,816 लोकांना कोरोनामुक्त करण्यात आलं आहे. तर चीननंतर जर्मनीमध्ये 72,600 लोक रिकव्हर झाले आहेत. याव्यतिरिक्त स्पेनमध्ये 70,853 आणि इराणमध्ये 49,933 लोक रिकव्हर झाले आहेत. तसेच अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत रिकव्हर झालेल्यांची संख्या 48,701 आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!

Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget