Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना आयसीयूमधून बाहेर आणण्यात आलं आहे. 6 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.
लंडन : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना आता आयसीयूमधून बाहेर आणलं आहे. परंतु, अजुनही जॉनसन यांनी डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, बोरिस जॉनसन यांना 27 मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. परंतु, 6 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.
ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉनसन यांना मार्च महिन्याखेरीस कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी काही दिवसांसाठी स्वतःला आयसोलेट केलं होतं. दरम्यान, जॉनसन यांच्या ऑफिसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहिती पत्रकात पंतप्रधानांची प्रकृती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता नसल्याचं सांगितलं होतं. परंतु, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर जॉनसन यांच्या ऑफिसच्या वतीने सांगण्यात आलं होतं की, जॉनसन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण व्हेंटिलेटर लावलेलं नाही. त्यांना लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉनसन लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली होती. यासंदर्भात मोदींनी ट्वीट केलं होतं. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक ट्वीट केलं आहे. त्यांनीही जॉनसन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
पाहा व्हिडीओ : कोरोनावर जगभरात काय संशोधन सुरू आहे? डॉक्टरांसोबत विशेष चर्चा
दरम्यान, जगभरात कोरोनाचा फैलाव होऊन शंभर दिवस लोटले आहेत. तरिही कोरोनाचं थैमान थांबवण्याचं नाव घेत नाही. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 65,000 पार पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 7,978 वर गेला आहे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये फक्त 135 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Corona | जगात कोरोनाचा हाहा:कार सुरुच, 16 लाखांच्यावर कोरोनाबाधित तर 95 हजारांहून अधिक बळी
Coronavirus | कोरोनाशी लढण्यासाठी मिस इंग्लंड भाषा मुखर्जी मैदानात, पुन्हा डॉक्टरच्या भूमिकेत