Coronavirus | जगभरात 14 लाखांहून अधिक कोरोना बाधित; तर मृतांचा आकडा 81 हजार पार
संपूर्ण जग कोरोनाच्या संकटापुढे हतबल झालं आहे. अशातच जगभरात कोरोनाचा हैदोस पाहायला मिळत आहे. अमेरिका, स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच आहे. तर चीनमध्ये गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही.

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत जगभरात 81 हजारांहून अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या 14 लाखांच्या पार गेली आहे. कोरोना व्हायरसचं नवं केंद्र अमेरिका झाल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 4 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत येथे 3,95,612 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
जगभरात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत आहे. येथे 3,95,612 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 12 हजार पार गेला आहे. कोरोनामुळे अमेरिकेमध्ये 12790 लोकांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित असून एक लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. तर मृतांचा आकडा 14 हजार पार गेला आहे.
पाहा व्हिडीओ : इटालियन लेखिका फ्रानसेस्को मेलॅंड्रींचं कोरोनावरील भावनिक पत्र, अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून वाचन!
अमेरिका आणि स्पेननंतर इटलीमध्येही कोरोनाचं मृत्यूतांडव पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 1,35,586 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 17121 लोकांचा मृत्यु झाला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत 604 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले असून ते आपल्या घरी परतले आहेत.
फ्रान्स आणि जर्मनीमध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतो. फ्रान्समध्ये 1,09,069 लोकांना या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्गामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 19 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
Coronavirus | ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये दाखल
जर्मनीमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1,07,663 वर पोहोचली आहे. तसेच जर्मनीमध्ये या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 2016 लोकांचा मृत्यु झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 36 हजारांहून अधिक लोक रिकव्हर झाले आहेत.
संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या देशांव्यतिरिक्त इराण, ब्रिटन, भारत, टर्की, बेल्जियम, नेदरलँड्स आणि कॅनडा या देशांमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. तर चीनमधील ज्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. तिथे मंगळवारी या व्हायरसमुळे एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही.
संबंधित बातम्या :
Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार!
Coronavirus | कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, जर्मनीत अर्थमंत्र्याची आत्महत्या
अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
