एक्स्प्लोर

Corona World Update | जगभरात कोरोनामुळं बळींची संख्या 4 लाखांवर, तर जवळपास 70 लाख कोरोनाबाधित

कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 69.73 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 34.11 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 70 लाखांच्या जवळपास रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं  मरणारांची संख्या आता चार लाखांच्या वर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण  69 लाख 73 हजार 427 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 02 हजार 049 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 34 लाख 11 हजार 118 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 76 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या घरात आहे. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 246,622 रुग्ण आहेत. तर 6,946 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 120,981 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 118,695 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत  19 लाख 88 हजार 544 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1 लाख 12 हजार 096 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 40,465 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 284,868   इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 6 लाख 75 हजार 830 कोरोनाबाधित आहेत तर 36,026 लोकांचा मृत्यू झालाय.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,135 लोकांचा मृत्यू झालाय. 288,390 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,846 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,801 हजार इतका आहे. कोणत्या देशात किती कोरोनाबाधित 1- अमेरिका:                   कोरोनाबाधित- 1,988,544                मृत्यू- 112,096 2- ब्राजील:                     कोरोनाबाधित- 675,830                  मृत्यू- 36,026 3- रशिया:                       कोरोनाबाधित- 458,689                  मृत्यू- 5,725 4- स्पेन:                         कोरोनाबाधित- 288,390                  मृत्यू- 27,135 5- यूके:                           कोरोनाबाधित- 284,868                    मृत्यू- 40,465 6- भारत:                        कोरोनाबाधित- 246,622                  मृत्यू- 6,946 7- इटली:                         कोरोनाबाधित- 234,801                    मृत्यू- 33,846 8- पेरू:                           कोरोनाबाधित- 191,758                    मृत्यू- 5,301 9- जर्मनी:                       कोरोनाबाधित- 185,696                    मृत्यू- 8,769 10- टर्की:                       कोरोनाबाधित- 169,425                    मृत्यू- 8,209 7 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत हे सात देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. इटली, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget