Coronavirus | डब्ल्यूएचओचं हर्ड इम्युनिटीबाबत 'हे' मोठं वक्तव्य!
जगभरातील वैज्ञानिक कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय शोधत आहेत. तसेच असा दावा केला जात आहे की, हर्ड इम्युनिटीमार्फत कोरोना व्हायरसला हरवणं सहज शक्य होतं. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने हा दावा फेटाळून लावला आहे.
जिनेवा : चीनमधील वुहान शहरातून संपूर्ण जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसने सध्या थैमान घातलं आहे. एकीकडे या घातक व्हायरसच्या विळख्यात अडकून लोक आपला जीव गमावत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक यावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच सुरुवातीपासूनच दावा केला जात आहे की, हर्ड इम्युनिटीमार्फत कोरोना व्हायरसला हरवणं सहज शक्य होतं. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भातील सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
WHO ने बोलताना 'हर्ड इम्युनिटी'मुळे कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. WHO ने सांगितलं की, कोरोना व्हायरस आता हर्ड इम्युनिटी उत्पन्न होण्याच्या परिस्थितीत नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने रिसर्चच्या आधारे दावा केला होता की, ब्रिटनमध्ये काही लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत आहे.
आपण हर्ड इम्युनिटीच्या परिस्थिती नाही : WHO
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन प्रमुख डॉक्टर माइकल रेयान यांनी सांगतिलं की, 'आपण हर्ड इम्युनिटी मिळवण्याच्या आशेवर राहता कामा नये. आता आपण त्या स्थितीच्या आसपासही नाही. जे व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक आहे.'
पुढे बोलताना ते म्हणाले की, हर्ड इम्युनिटी म्हणजे कोरोनावरील समाधान किंवा उपाय नाही. आतापर्यंत झालेल्या संशोधनांमधून हिच बाब समोर आली आहे की, फक्त 10 ते 20 टक्के लोकांमध्येच संबंधित अँन्टीबॉडिज आहेत. ज्या शरीरात हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी मदत करतात. परंतु, एवढ्या कमी अँन्टीबॉडीजच्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकत नाही.
हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?
कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करणं अत्यंत कठीण आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो तुम्हाला गाठतोच. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याऐवजी याचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही स्वतःला घरात बंद करुन ठेवलं तर जेव्हा बाहेर पडाल तेव्हा हा व्हायरस तुम्हाला स्वतःच्या विळख्यात अडकवतो. त्यामुळे याला घाबरुन न जाता याचा सामना करा. जेवढ्या जास्त व्यक्ती कोरोना बाधित होतील, तेवढाच मानव या महामारीविरोधात लढण्यासाठी सक्षम होईल. या थिअरीला हर्ड इम्युनिटी म्हणतात.
महत्त्वाच्या बातम्या :
उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा होतोय कोरोना!
Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
कोरोनाच्या संकटकाळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन्सचा ओव्हरडोस घेताय? सावध व्हा