Coronavirus | इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा हाहाकार, एका दिवसात 49 लोकांचा मृत्यू
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा संबंध थेट सी-फूडशी आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत. कारण या विषाणुंचा एक समूह थेट रूग्णांच्या शरीरावर इफेक्ट करत आहे. हा व्हायरस उंट, मांजर तसेच वटवाघुळ यांसारख्या अनेक प्राणी आणि पक्षांमध्ये पसरत आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. चीनमधील वुहान शहातून सुरू झालेलं हे संक्रमण आतापर्यंत 90 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलं आहे. तसेच इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी आणखी 49 लोकांचा मृत्यू झाला. फक्त एका दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. इटलीमध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 197 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची बाधा झाल्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू चीनमध्ये झाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर इटली आहे. इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेले एकूण 4,636 रूग्ण समोर आले आहेत. जे प्रमाण चीन, दक्षिण कोरिया आणि इराणनंतर सर्वाधिक आहे.
जगात कोरोनाचा उद्रेक! 3200 लोकांचा मृत्यू
जगभरातील जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. तर आतापर्यंत जवळपास 3300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ब्रिटनमध्ये या संसर्गामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेने 6.3 बिलियन डॉलरचा फंड जारी केला आहे.
चीननंतर आता इटली आणि इराणमध्ये कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. याव्यतिरिक्त दक्षिम कोरोनामध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे.
काय आहे कोरोना व्हायरस?
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा संबंध थेट सी-फूडशी आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत. कारण या विषाणुंचा एक समूह थेट रूग्णांच्या शरीरावर इफेक्ट करत आहे. हा व्हायरस उंट, मांजर तसेच वटवाघुळ यांसारख्या अनेक प्राणी आणि पक्षांमध्ये पसरत आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह#CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेशउत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश