एक्स्प्लोर
Advertisement

जगात कोरोनाचा उद्रेक! 3200 लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरस आत्तापर्यंत आपल्या देशाच्या वेशीवरच होता. पण आता मात्र तो देशात धडकलाय आणि आणि ते ही मोठ्या प्रमाणात देशाच्या वेगवेगळ्या भागात थेट 28 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आणि आता मात्र काळजीचं रुपांतर काहीशा घबराटीच्या वातावरणात झालं आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांमधील मृत्यू दराचे प्रमाण 3.4 टक्के आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू दराचे वाढते असून जगात आतापर्यंत 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे तर जगात 93000 पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे.
81 देशात करोना व्हायरसचे थैमान
संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसमुळे आतापर्यंत 3200 लोकांता मृत्यू झाला आहे. 12 जानेवारी पर्यंत फक्त चीन कोरोना व्हायरसशी लढत होता. परंतु आता महिन्यात कोरोना व्हायरस 81 देशांत पसरला आहे. मागील पाच दिवसात कोरोना व्हायरस 22 देशांत पसरला आहे. भारतात कोरोना व्हायरस जानेवारी महिन्यात दाखल झाला होता.
रुग्णालयांना स्वतंत्र वॉर्ड बनवण्याचा आदेश
देशातील सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड तातडीने बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश याआधीही रुग्णालयांना देण्यात आला होता. सहसचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी अनेक रुग्णालयांना भेट दिली आणि त्यांनी तिथे स्थापन केलेल्या सुविधांचा आढावाही घेतला, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.
देशात आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त चाचण्या
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की, भारतात तीन हजारांपेक्षा जास्त चाचणी झाल्या आहेत. 15 चाचणी प्रयोगशाळा आधीच बनवण्यात आल्या होत्या. आणखी 19 बनवण्यात आल्या आहेत, तर आठ प्रयोगशाळा काल सुरु झाल्या असून काही आज सुरु होतील.
Corona Virus | 15 एप्रिलपर्यंत कोरोना संपुष्टात, नांदेडमधील आयुर्वेदाचार्यांचा दावा
3 किमी परिसरातील लोकांशी संपर्काची गरज
कोरोना व्हायरसची प्रकरणं जिथून समोर आली आहे, तिथल्या तीन किलोमीटरच्या परिसरात प्रत्येक घरात जाऊन लोकांशी संपर्क करण्याची गरज आहे. दिल्लीच्या रुग्णानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 66 जणांची ट्रेसिंग करण्यात आली आहे, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
