एक्स्प्लोर

Amit Thackeray In Shivsena Bhavan: अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO

Amit Thackeray-Aditya Thackeray: आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन उमेदवारांसमोर सादर केलं.

Amit Thackeray-Aditya Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन उमेदवारांसमोर सादर केलं. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 227 उमेदवारांसमोर मुंबईतील शिवसेना भवनात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचं प्रेझेंटेशन मांडलं. यावेळी मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी कटीबध्द असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यादरम्यान, शिवसेना भवनात अमित ठाकरेंच्या एका विधानाने टाळ्यांचा कडकडाट झाला. (Shivsena UBT-MNS Alliance)

शिवसेना भवनात नेमकं काय घडलं? (Amit Thackeray-Aditya Thackeray)

मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन सादर करण्याआधी अमित ठाकरे यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन केलेच पण ज्यांना या युतीत तिकीट मिळालं नाही. त्या सर्व इच्छुकांचे मनापासून अभिनंदन केलं. या एकाही इच्छुकाने इतर पक्षांत तिकिटासाठी जे जे प्रकार केले तसं काहीही केलं नाही. उलट मराठी माणसाच्याप्रतीची बांधिलकी किती उच्च दर्जाची असू शकते हे सोदाहरण सिद्ध केलं. आपल्यातील कोणीही महापालिकेचं तिकीट मिळालं नाही म्हणून कुठेही मारामारी केलेली नाही. कोणतं कार्यालय फोडलं नाही, कोणीही एबी फॉर्म गिळला नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हीच निष्ठा असते. हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना भवनात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. अमित ठाकरेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Uddhav Thackeray-Raj Thackeray)

मुंबईतला मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, सामान्य मुंबईकर आणि मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलो असून आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का कराल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी कोणत्या घोषणा केल्या? (Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026)

  1. 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ
  2. मुंबईकरांसाठी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार
  3. पालिकेचे गृहनिर्माण प्राधिकरण करुन 5 वर्षांत 1 लाख परवडणारी घरे देणार
  4. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये 
  5. कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण 
  6. तरुणांना लाख रुपर्यंत  रोजगार सहाय्यता निधी 
  7. बेस्ट बसचे तिकीट  कमी करून ५-१० १५-२० रुपये फ्लॅट रेट करणार
  8. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर 
  9. मुंबईत नवी पाच वैद्यकीय महाविद्यालये
  10. महापालिकेचे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारणार

संबंधित बातमी:

मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget