एक्स्प्लोर

Corona World Update | जगभरात कोरोनामुळे 100 दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त बळी

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाखांपेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 1 लाख 2 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 76 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई : जगभरात कोरोनामुळे 100 दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. सद्यस्थितीत जगभरात कोरोनाचे जवळपास 17 लाख रुग्ण असून बळींची संख्या 1 लाख 2 हजारांवर आहे. यापैकी तीन लाख 76  हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 12 लाख 19 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 850 कोरोनाबाधित गंभीर आहेत.

लॉकडाऊन हटवलं तर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणणं कठीण जाईल, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस यांनी दिला आहे.  लॉकडाऊन हटवण्यात घाई केली तर बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हटलं आहे.

अमेरिकेत हाहाकार सुरुच

अमेरिकेत गेल्या 24 तासात 2  हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. अमेरिकेत आता एकूण बळींचा आकडा 18 हजार 726 वर तर  रुग्णांची संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे.

न्यूयॉर्क प्रांतात काल 777 बळी गेले आहेत. तिथे रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजारांवर आहे तर एकूण मृतांचा आकडा 7844 इतका आहे.

त्या खालोखाल न्यूजर्सीत 1932, मिशिगन मध्ये 1281, लुझियाना 755, इलिनॉईस 596, कॅलिफोर्निया 584 आणि वॉशिंग्टनमध्ये 483 लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.

गेल्या 10 दिवसात अमेरिकेने तब्बल 14 हजार 662 लोक गमावले आहेत.

स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 634लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 16 हजार 81 वर पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसात स्पेनने 7 हजार 617 लोकं गमावली.

काल इटलीत कोरोनाने तुलनेनं कमी म्हणजे  570 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 18  हजार 849 इतकी झाली आहे. काल रुग्णांची संख्या 4 हजारने वाढली,  इटलीत आता जवळपास 1 लाख 48 हजार रुग्ण आहेत. इटलीत 9 मार्चला सुरु झालेला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे.

इंग्लंडसाठी कालचा दिवस आणखीनच चिंतेचा होता, तिथे एका दिवसात सर्वाधिक 980 लोकांचा जीव गेला, तिथला बळीचा आकडा पोहोचला 8958 वर पोहोचला आहे.

त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणजे कोरोनाबाधित  पंतप्रधान बोरीस जॉन्सन अतिदक्षता विभागातून बाहेर आले आहेत.

फ्रान्सने काल दिवसभरात 987 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 13 हजार 197 बळी गेले आहेत. एकूण रुग्ण सव्वा लाखाच्या घरात आहेत.

राज्यात दिवसभरात 210 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; मुंबईतील संख्या हजारच्या वर

जर्मनीत काल 160 बळी गेले, एकूण बळींची संख्या 2767 इतकी आहे.

इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 122 ची भर पडली. एकूण 4232 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. तर रुग्णांची संख्या 68200 इतकी झाली आहे.

कोरोनाने बेल्जियममध्ये काल 496 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा3019 इतकी झाली आहे.

हॉलंडमध्ये काल 115 बळी घेतले तिथे एकूण 2511 लोक दगावले आहेत,  टर्की,  ब्राझील, स्वित्झर्लंडने 1 हजार बळींचा टप्पा ओलांडला आहे.

स्वीडनमध्ये 870 , पोर्तुगाल 435, कॅनडात 569, इंडोनेशिया 306, तर इस्रायलमध्ये 95 बळी कोरोनोमुळे गेले आहेत.

दक्षिण कोरिया  काल 4 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 208 वर पोहोचला आहे.

आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4695 वर पोहोचली आहे, तिथे 66 लोकांचा बळी घेतला आहे.

कोरोनाने गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 94, 110 तर बळींच्या आकड्यात  7009 ची भर पडली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget