चिंता मिटली! चीनचे अनियंत्रित रॉकेट The Long March 5B हिंदी महासागरात कोसळलं
चीनचे अनियंत्रित रॉकेट The Long March 5B जगाच्या कोणत्याही भागात कोसळू शकते असं सांगण्यात येत होतं. आता हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या स्टेट मीडियाने दिली आहे.
बीजिंग : चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B आता हिंदी महासागरात कोसळलं असल्याचं वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. त्यामुळे हे रॉकेट आता कुठे कोसळणार याच्या अफवांना आळा बसला आहे तसेच जगाची चिंताही मिटली आहे. हिंदी महासागरात कोसळण्याच्या आधी या रॉकेटचे बहुतांश भाग हे जळून नष्ट झाले होते.
चीनच्या स्टेट मीडियाने सांगितलं आहे की, The Long March 5B च्या अवशेषांनी बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार, 10 वाजून 24 मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. नंतर या रॉकेटचे अवशेष 72.47 डिग्री पूर्व अशांश आणि 2.65 डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले. हे ठिकाण मालदीवच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे.
Remnants of China's biggest rocket landed in the Indian Ocean, with the bulk of its components destroyed upon re-entry into the Earth's atmosphere, according to Chinese state media https://t.co/hwFi9yIFsz pic.twitter.com/2O7zEKHWwH
— Reuters (@Reuters) May 9, 2021
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना या रॉकेटचा बहुतांशी हिस्सा जळून खाक झाल्याची माहिती चीनच्या स्टेट मीडियाने दिली आहे. जवळपास 100 फुट लांब असलेले हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत होतं. चीनने या रॉकेटच्या मदतीने अंतराळात तयार करण्यात येत असलेल्या स्पेस स्टेशनचा पहिला भाग पाठवला होता. चीन तियान्हे नावाचे एक स्पेस स्टेशन अवकाशात उभं करत आहे.
या रॉकेटचे तुकडे नेमके कुठे आदळणार याची माहिती नसल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट पडेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हे रॉकेट हिंदी महासागरात पडल्याने जगाची चिंता मिटली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona cases Yesterday : देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित; गेल्या 24 तासांत 4092 रुग्णांचा मृत्यू
- Assam : हेमंत बिस्वा सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री? विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती
- लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतर, कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक; Bharat Biotech च्या सह-सस्थापिका सुचित्रा इला यांचं मत