Corona cases Yesterday : देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित; गेल्या 24 तासांत 4092 रुग्णांचा मृत्यू
Corona cases Yesterday : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अशातच देशात सलग पाचव्या दिवशी 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 403,738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
Corona cases Yesterday : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. भारतात दिवसाला जवळपास 4 हजार रुग्णांचा मृत्यू होतोय. तसेच देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची देशात नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 403,738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4092 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,86,444 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नव्या कोरोनाबाधितांचं देशात निदान झालं होतं.
8 मेपर्यंत देशात 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल 20 लाख 23 हजार 532 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत एकूण 30 कोटी 22 लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. एका दिवसापूर्वी 18.65 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्च करण्यात आल्या, ज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 22 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 22 लाख 96 हजार 414
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 83 लाख 17 हजार 404
एकूण सक्रिय रुग्ण : 37 लाख 36 हजार 648
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 42 हजार 362
देशातील कोरोना मृत्यूदरात वाढ झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 17 टक्क्यांहून अधिक झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्ठानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
शनिवारी राज्यात 82,266 रुग्णांना डिस्चार्ज तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र काल राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण काल 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4347592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.3% एवढे झाले आहे.
काल राज्यात 53605 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे तर राज्यात काल 864 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राने आज 75 हजार मृत्यूचा आकडा पार केला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Long March 5B : अवकाशात भरकटलेलं चीननं रॉकेट आज कोणत्याही क्षणी पृथ्वीवर 'या' भागात धडकणार
- मोदी सरकारकडून कोरोना नव्हे, ट्विटरवरील टीकांना हटवण्यास प्राधान्य, लँसेटमधून ताशेरे
- लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतर, कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक; Bharat Biotech च्या सह-सस्थापिका सुचित्रा इला यांचं मत