अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. (Image Source: AP/Zabi Karimi)
2/9
अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे. (Image Source: AP/Zabi Karimi)
3/9
अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील. (Image Source: AP/Zabi Karimi)
4/9
अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे शांततापूर्ण मार्गाने हस्तांतर करावं असं आवाहन तालिबानने केलं आहे.(Image Source: AP/Gulabuddin Amiri)
5/9
त्या आधी तालिबानने कंदहार आणि जलालाबाद ही दोन प्रमुख शहरं ताब्यात घेतली होती. गझनी प्रांताच्या गव्हर्नरच्या निवासस्थानावर तालिबान्यांनी आपला ध्वज फडकवला. (Image Source: AP/Gulabuddin Amiri)
6/9
ब्रिटनने आपल्या दूतावासातील अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी 600 सैनिकांची तुकडी पाठवली. (Image Source: AP Photo)
7/9
तालिबानने काबुलवर नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर परकीय नागरिकांनी देश सोडण्याला प्राधान्य दिले. (Image Source: AP Photo)
8/9
रविवारी उशीरा काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासासमोर एक मोठा स्फोट घडला. (Image Source: AP/Rahmat Gul)
9/9
भारतानेही रविवारी आपल्या 124 नागरिकांना आणि इतर अफगाणी नागरिकांना सुखरुपपणे भारतात परत आणले. अफगाणिस्तामधील परिस्थीती लक्षात घेता भारत सरकारने एयर इंडियाला अद्याप दोन विमानं तयारीत ठेवायला सांगितलं आहे. (Image Source: AP/Dinesh Joshi)