एक्स्प्लोर
Advertisement
ऐन दिवाळीत चीनी बनावटीच्या वस्तुंवर भारतीयांचा बहिष्कार, विक्रीत कमालीची घट
मुंबई : चीनी बनावटीच्या वस्तुंवर देशभरात नागरिकांनी बहिष्कार घातल्यामुळे चीनी वस्तुंच्या विक्रीत 60 टक्क्यांनी घट झाली आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चीनने समर्थन दिलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावरुनह मोठ्या प्रमाणावर चीनी वस्तुंविरोधात कॅम्पेन चालवण्यात आलं.
सोशल मीडियाच्या कॅम्पेननंतर ग्राहकांसोबत व्यापाऱ्यांनीही चीनी बनावटीच्या वस्तुंमध्ये उत्साह दाखवला नव्हता. याचाच परिणाम म्हणून देशात तयार झालेल्या वस्तुंना मोठी मागणी होती. तसंच मातीच्या वस्तू, कागदी आणि प्लॅस्टिकच्या वस्तुंना नागरिकांनी जास्त पसंती दिल्यामुळे चीनी बनावटीच्या वस्तुंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांची घट झाली आहे.
चीनी बनावटीच्या सामानाऐवजी यावर्षी दिवाळीत देशभरात कागद, मातीच्या वस्तू, चॉकलेट, सुका मेवा, मिठाई, देशी उपकरणं, तसंच तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये बनवण्यात आलेल्या फटाक्यांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. चीनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कारामुळे चीनी बाजारपेठेवर दबाव निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement